raver panchayat samiti sakal
जळगाव

पन्नास वर्षीपूर्वीचे भूषण; शेतकरी पती-पत्नीचे शिल्प मोडकळीस

पन्नास वर्षीपूर्वीचे भूषण; शेतकरी पती-पत्नीचे शिल्प मोडकळीस

सकाळ डिजिटल टीम

रावेर (जळगाव) : येथील पंचायत समितीच्या नवीन (Raver panchayat samiti) इमारतीसमोर सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे शेतकरी (Farmer) पती-पत्नीचे शिल्प मोडकळीस आले आहे. ते दुरुस्त करून किंवा बदलून त्या जागी तसेच नवीन शिल्प बसविण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. (raver-panchayat-samiti-farmer-stachu-in-history)

येथील पंचायत समितीच्या आवारात समोरच दर्शनी भागात शेतकरी पती- पत्नीचे अतिशय सुंदर प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेले शिल्प आहे. एक शेतकरी खांद्यावर छोटासा नांगर घेऊन चालला असून, त्याच्यामागोमाग त्याची पत्नी डोक्यावर घमेले घेऊन शेताकडे निघाली आहे, असे हे सुंदर शिल्प या परिसरात येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पंचायत समिती ही ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते. त्या पार्श्‍वभूमीवर हे शिल्प त्या वेळच्या लोकप्रतिनिधींच्या कल्पकतेची साक्ष देते. शिल्प केव्हा बसविण्यात आले, याचा उल्लेख तिथे नसला तरीही १९६६-६७ च्या आसपास ते बसविले आहे. त्या वेळेस हे शिल्प पंचायत समितीचे तत्कालीन पदाधिकारी रामकृष्‍ण पाटील (सभापती), हिरामण कोल्‍हे (उपसभापती, जिल्हा परिषद), दुलबा पाटील (उपसभापती) आणि सदस्य राजाराम महाजन यांच्यासह असंख्य सदस्यांनी वर्गणी गोळा करून बसले होते. आता या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या शिल्पाला सुमारे ५५ वर्षे झाली असून, त्याला ठिकठिकाणी बारीक तडे गेले आहेत. त्याचा खालील चौथराही ढासळला आहे. मागील काळात त्याची व्यवस्थित देखभाल-दुरुस्ती न झाल्याने शिल्पाची दुरवस्था झाली आहे. आता नव्या दिमाखदार इमारतीसमोर हे जुने दुरवस्था झालेले आणि मोडकळीस आलेले शिल्प पाहून वाईट वाटते. पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सभापती जितू पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय मांडला.

..प्रसंगी वर्गणी गोळा करू

या पुतळ्याची आवश्यक ती दुरुस्ती करून किंवा असाच पूर्णाकृती पुतळा नव्याने तयार करून तातडीने बसवण्याची मागणी त्यांनी केली आणि सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. प्रसंगी या कामासाठी लागणारा निधी सर्वच पंचायत समिती सदस्य वर्गणी करून देतील, असे आश्‍वासन श्री. पाटील यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात लवकरच या ठिकाणी नवे शिल्प बसेल, असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT