"किड्‌सगुरुकुल'च्या प्राचार्यांकडे सात लाखांची घरफोडी 
"किड्‌सगुरुकुल'च्या प्राचार्यांकडे सात लाखांची घरफोडी  
जळगाव

लॉकडाऊन संपण्यापूर्वीच "चोरटोळ्या' झाल्या सक्रिय ;"किड्‌सगुरुकुल'च्या प्राचार्यांकडे सात लाखांची घरफोडी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव :- शहरातील दौलत नगरात राहणाऱ्या किड्‌स गुरुकुलच्या प्राचार्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. मीनल जैन यांच्या घराची दारे उघडी दिसल्याने शेजाऱ्यांनी फोन करून कळविल्यावर घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

मोहाडीरोड वरील विस्तारित परिसर दौलत नगरात मुख्य रस्त्यावरच प्लॉट (क्र.26) मध्ये मीनल संतोष जैन कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. लॉकडॉऊन असल्याने गेल्या महिनाभरापासून त्या आई प्रेमलता, वडील संतोष जैन, भाऊ नितीन जैन व वहिनी कृती जैन यांच्यासह किड्‌स गुरुकुल स्कूलमध्येच वास्तव्याला होते. अधून-मधून त्यांचे घरी येणे-जाणे होते. तीन दिवसापूर्वीच त्या घरी येऊन परत शाळेत गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी जैन यांच्या घराचे दारे उघडी दिसल्याने संशय येऊन त्यांचे शेजारी गजानन चावदस मराठे यांनी पाहणी केली असताना चोरीचा संशय आल्याने त्यांनी मोबाईलवर संपर्क करून जैन यांना माहिती दिली. तत्काळ घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना कळवण्यात आली. सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, हवालदार अनिल फेगडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, विजय काळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

दागिन्यांसह दस्तऐवज लंपास 
वॉलकंपाऊंड भिंतीवरून उडी घेत चोरट्यांनी मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडला नंतर घरात आल्यावर दारे खिडक्‍या बंद करून निवांतपणे संपूर्ण घरात सर्च ऑपरेशन राबवून स्वयंपाक घरातील फ्रिज व डब्या पासून ते घरातील कपाटे व पलंगातील साहित्य उलथापालथ करून कपाटात व बेडमध्ये ठेवलेले दागिने, रोख रक्कम, नकली दागिने, शाळेचे महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्तेचे कागद, त्याशिवाय बक्षीस म्हणून मिळालेल्या एकेक महागड्या चीज-वस्तूंसह सात लाखांवर ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे आढळून आले. 

तपासाची मदार सीसीटिव्हीवर 
जाताना या चोरट्यांनी मुख्य दाराला आतून कडी लावून मागील द्वाराने पलायन केल्याचे आढळून आले आहे, पहाणी नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ श्वान पथकाला पाचारण करून संशयितांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ञांनी घरातील विविध ठिकाणचे ठसे संकलित केले असून परिसरातील सिसीटीव्ही संकलित करण्यासाठी सायबर टिम कार्यरत झाली आहे. सीसीटीव्हीतूनच संशयितांचा माग' मिळणार असल्याचा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला. 

---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT