कृऊबात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी पेटवली ;१लाख४० हजारांची रोकड लंपास  
जळगाव

कृऊबात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी पेटवली ;१लाख४० हजारांची रोकड लंपास

रईस शेख

जळगाव, ः-कृषीउत्पन्न बाजार समिती आवारातील देान बंद दुकाने चोरट्यांनी फोडून एका दुकानातून १लाख ३५ हजार रोकड व दुसऱ्या दुकानातून ५ हजार रोख अशी चोरी करून नंतर देान्ही दुकाने पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रोकडसह चोरट्यांनी दुकानातील एलसीडी टीव्ही आणि एसी व इतर साहित्य चोरुन नेले आहे. 


शाहूनगर येथील रहिवासी नंदलाल जीवनराम राठी यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुकान नंबर 50 गुळांची लाईन येथे नंदलाल जीवनराम राठी , जीवनराम भगवानदास राठी व महेश नंदलाल राठी , प्रकाश सुभाषचंद्र डोडिया या नावाचे बारदान विक्रीचे तसेच धान्य विक्रीचे दुकाने आहेत . सतरा रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून राठी हे घरी परतले होते . मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून तसेच दुकानाच्या आत असलेली खिडकी तोडली व दुकानातील पाच हजारांची रोकड लंपास केली. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी राठी यांचे दुकान पेटवून गेले या आगीत साठ्यांचे बँकेचे चेक बुक्स जमा खर्च’ एलआयसीची कागदपत्रे दुचाकी चारचाकी वाहनांचे आरसी बुक इशुरन्स टँक्स संबंधित कागदपत्रे तसेच दुकानातील फर्निचर एअरकंडिशनर इन्व्हर्टर व इतर साहित्य असे एकूण एक लाख रुपये किमतीचे साहित्य व कागदपत्रे जळून खाक झाली .घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पेालिसांनी पंचनामा केला असून लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या घटनेत जळून खाक झाले आहे. 

एसीसह सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लांबविला 
राठी यांच्या दुकानात प्रताप केल्यानंतर चोरट्यांनी राठी यांच्या रांगेत असलेल्या पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या बारदान व धान्य विक्रीच्या दुकानाकडे मोर्चा वळवला . या दुकानाचाही चोरट्यांनी लोखंडी दरवाजा तोडून शोधात दुकानातून 1 लाख 35 हजार रुपये तसेच सीसीटीव्ही कॅमेराची हार्डिक्स’ डीव्हीआर, एलसीडी नेट राउटर असे एकुण 35 हजाराचे साहित्य असा 1 लाख 60 हजार किमतीचा ऐवज लांबविला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी हे दुकानही पेटवून दिले आगीत या दुकानातील एअरकंडिशनर खुर्ची टेबल फर्निचर असे एकूण चाळीस हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT