वीज गेल्याने दार उघडे करून ठेवणे पडले महागात 
जळगाव

वीज गेल्याने दार उघडे करून ठेवणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव,  :- लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एकाच गल्लीतील तिघांच्या घरातून तीन मोबाईल, कपड्यांची बॅगसह रोकड लंपास केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

दाखल गुन्ह्यात तक्रारदार रत्नाबाई मुरलीधर बैरागी (वय-28) रा. भगवान किराणा दुकानाजवळ रामेश्वर कॉलनी हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवार जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी दरवाजा उघडा ठेवून घरातच झोपले. लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात ठेवलेला 5 हजार रुपयाचा मोबाईल चोरीस झाल्याचे आढळून आले. दरम्यान आज सकाळी 6 वाजता उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. ते घराबाहेर आल्यावर गल्लीत आल्यावर घराच्या शेजारी राहणारा त्यांचा भाऊ अनिल नारायण बैरागी यांचा मॅक्रोमॅक्‍स कंपनीचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल, कपड्याची बॅग व 1 हजार रुपये रोख आणि गल्लीत राहणारे किरण सुपडू कोचुरे यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी गेल्याचे समोर आले. रत्नाबाई बैरागी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक. महेंद्रसिंग पाटील आणि महेंद्र गायकवाड करीत आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT