Violation of the ban due to more than fifty brides 
जळगाव

शुभ मंगलम्‌ सा ऽ ऽ वधान..अन्‌ धडकले पोलिस 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. अंत्ययात्रेत वीस पेक्षा कमी आणि विवाह सोहळ्यात पन्नास पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीची अट लागू केली आहे, असे असताना शहरातील एसएमआयटी कॉलेजमध्ये आयोजित विवाह सोहळ्यात वऱ्हाडींची गर्दी झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. परिणामी या प्रकरणी वधू पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी सह कलम-37 (1)(3) लागू करण्यात आलेले आहे. महामारी काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास, सभा, समारंभास बंदी घालून देण्यात आली आहे. जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात पन्नासपेक्षा अधिक वऱ्हाडींची गर्दी झालेली होती. पोलिस निरीक्षक अरुण निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता महाविद्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात गर्दी झालेली आढळून आल्याने पोलिस नाईक मनोज पाटील यांच्या तक्रारीत नमूद केल्या नुसार, विना परवानगी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्या प्रकरणी वधू पिता दुर्गेश नारायणराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT