Female activist Jyoti Bhoi's suicide;  
जळगाव

महिला कर्यकर्त्या ज्योती भोईंची आत्महत्या ; पोलिस निरीक्षकासह अनेकांवर संशयाची सुई

रईस शेख

जळगाव, ः अमळनेर येथील महिला कार्यकर्त्या तथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी ज्योती धनराज भोई (वय-३५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत ज्योती यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, एका पोलिस निरीक्षकासोबत गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे वाद सुरू असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. अमळनेर पेालिसांत याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाईड नोट मिळाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

अमळनेर येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या ज्योती धनराज भोई (वय-३५) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. दिवस उजाडल्यावर गावी आलेल्या भावाने दार ठोवल्यावरही खोलीचे दार उघडत नाही म्हणून डोकावून बघितल्यावर हा प्रकार समोर आला. पोलिसांना महिती मिळाल्यावर ते तातडीने घटनास्थळावर पोलिस दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. अमळनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस तपास करीत आहेत. 

‘सुसाईड नोट’ची चर्चा 
अधिकृत सूत्रान्वये मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भोई यांनी लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये चार-पाच वर्षापूर्वी अमळनेर पेालिस ठाण्यात निरीक्षक असलेले व सध्या नगर जिल्ह्यात कार्यरत एका पोलिस निरीक्षकासह इतरांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. याच प्रकरणातून साधारण दोन महिन्यापूर्वी नगर जिह्या‍यातून मोटारसायकलीवर आलेल्या शबनम काझी नावाच्या एका तरुणीने ज्योती भोई यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती. त्यावेळी देखील या पोलिस निरीक्षकाचेच नाव चर्चेत येऊन ते दाखल गुन्ह्यातही नमूद करण्यात आले होते. 

सुसाईड नोट मिळाली नाही 
गळफास घेतल्याने मृत्यू झाला आहे. सुसाईड नोट मिळून आली नसून आम्ही शोध घेतोय, आकस्मिक मृत्यू प्रकरणात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
- अंबादास मोरे 
निरीक्षक, अमळनेर पेालिस ठाणे 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT