घरातून पत्नीची पेात तोडून पळाला...चोर 
जळगाव

घरातून पत्नीची पेात तोडून पळाला...चोर

रईस शेख

जळगाव - शहरातील रामेश्‍वर कॉलनी मेहरुण येथील मिस्तरी काम करणारे राजेंद्र शांताराम पाटील (वय-३२) यांच्या घरात शिरून एका भामट्याने पत्नीची पेात तोडून पळ काढला. घरातून पळत सुटलेल्या तरुणाचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडले. अंगझडतीत त्याच्या खिशात डोरले मिळून आल्यानंतर त्याला त्याच्या साथीदारासह पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. एमआयडीसी पेालीसात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

राजेंद्र शांताराम पाटील कुटुंबीयांसह मंगलपुरी मंदिरा जवळ वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी २ वाजता त्यांच्या रामेश्‍वर कॉलनी येथील घरातून अठरा ते वीस वर्षीय तरुण पळत सुटला. त्याचा पाठलाग केल्यावर तो, गल्ली बोळातून पळत सुटला व नंतर दिसेनासा झाला. घरी आल्यावर पत्नी शामबाला यांनी सांगितले की, त्यांच्या गळ्यातील पेात ओढून एक तरुण पळाला. त्याच्या हातात पोत मधील सेान्याचे डोरले लागले असून ते घेऊन तो पळून गेला आहे. राजेंद्र पाटील यांनी भाऊ आनंदा पाटील यांनी वाहन काढून त्या चोरट्याचा शोध सुरू केला. एक तरुण शर्ट काढून रस्त्याच्या कडेला सापडल्यावर त्याची चौकशी केल्यावर त्याच्या खिशातून एक सोन्याचे डोरले सापडले. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पेालिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी संतोष सोनवणे सचिन पाटील योगेश बारी घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला नावगाव विचारल्यावर त्याने गौरव जगन साळुंखे (वय-२०रा. अशोक किराणा जवळ) त्याला ताब्यात घेतल्यावर त्याला मोटारसायकल(एमएच.१९.सीएल.९७१२)वरील त्याचा साथीदार गौरव रवींद्र खरे (वय-१८) अशा दोघांना दुचाकीसह एमआयडीसी पेालीस ठाण्यात आणून पेालिसांच्या स्वाधीन केले. पेालिसांनी चौकशी केल्यावर त्याच्या खिशातून तोडलेल्या पोत मधील डोरले सापडले असून रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT