भोकणी शिवारात शेतकऱ्यांवर लुटारूंचे हल्ले ; दगडफेक करून लुट
भोकणी शिवारात शेतकऱ्यांवर लुटारूंचे हल्ले ; दगडफेक करून लुट 
जळगाव

भोकणी शिवारात शेतकऱ्यांवर लुटारूंचे हल्ले ; दगडफेक करून लुट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, :- धरणगाव तालुक्‍यातील भोकणी शिवारातील शेतात रखवालदारी करणाऱ्या सालदार कुटुंबीयांवर हल्ला चढवून शेतातील साहित्य लांबवण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात एका मागून एक दोन घटना घडल्या असून हल्ला झाल्यावर एका घटनेत तर, पाळधी औटपोस्टला फोनही लावण्यात आला मात्र, पोलीस पोचलेच नाही. परिणामी शेतीतील पंपासह मिळेल ते, साहित्य घेऊन चोरटे पसार झाले. 

गिरणानदी काठावर बांभोरी नंतर भोकणी (ता.धरणगाव) गाव आहे, गावातील लोकसंख्या मर्यादित असली तरी, शेतशिवार मोठे आणि सधन शेतकऱ्यांचा परिसर आहे. गेल्या शनिवारी भोकणी शिवारातील डॉ.नितीन पाटील यांच्या शेतात आठ ते दहा चोरट्यांनी हल्ला चढवून शेतातून विद्युत पंप आई इतर साहित्य घेऊन पोबारा केला. दोन दिवस उलटत नाही तोवर याच शिवारातील जाखेटे यांच्या शेतावर पहाटे काही चोरट्यांनी हल्ला केला. शेतातील जनरेटर आणि इतर शेती उपयोगी साहित्य उचलून नेताना सालदारांनी हटकल्यावर चोरट्यांच्या एकागटाने त्यांच्यावर हल्ला चढवून तुफान दगडफेक करीत चोरी करून पोबारा केला. चोरी होत असताना येथील सालदारांनी पाळधी औटपोस्टला फोनही लावला होता. मात्र, येथे हजर हवालदाराने गाडी राऊंडवर गेली आहे. निरोप दिला असून तिकडेच येतील असे सांगून फोन ठेवला. दिवस उजाडल्यानंतरही पोलिसांची गाडी पोहचु शकली नाही. हीच परिस्थिती बांभोरी, पथराड, पाळधी या शिवारातील गावातील शेतांमध्ये असून शेतात आता सालदार रात्री थांबण्यासही तयार नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT