Leader caught by stealing electricity cable..a second arrest for fleeing 
जळगाव

विद्युत केबल चोरुन नेतांना चोरट्याला पकडले..पळून गेलेला दुसराही अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, - एमआयडीसी परीसरातील जी-सेक्टर मध्ये विद्युत मंडळाचे गाळणीकक्ष स्टोअर भंडार आहे. सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास येथून विद्युत तारांसह साहित्य चोरुन पळतांना दोन चोरटे कर्मचाऱ्यांच्या निदर्षनास आले असून त्यांचा पाठलाग करुन एकाला पकडून पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यावर पळून गेलेल्या चोरट्याला एमआयडीसी पेालिसांनी अटक केली आहे.  

एमआयडीसी-जी सेक्टर मध्ये विद्युत मंडळाच्या गाळणी कक्ष भंडार विभागात चोरीची घटना घडली उपअभियंता संदिप निरंजनसह निलेश पर्वतकर, अतुल मार्कंड, आनंदा सपकाळे, योगेश कोळी, गणेश भिवर असे कार्यरत असतांना गाळण कक्षाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या विद्युत साहित्यातून केबलवायरचे तुकडे आणि ॲल्युमिनीयम तारांचा गोफ असे साहित्य चोरुन नेतांना देान तरुण दिसून आले. कर्मचाऱ्यांनी दोघांचा पाठलाग करुन त्यापैकी एकाला पकडले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. चोरी करतांना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला एमआयडीसी पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याचे नाव चेतन केशव साळूंखे (वय-३२,रा.सतगुरुनगर आयोध्यानगर) असे असून त्याचा साथीदार बाळू सैंदाणे हा पळून गेल्याचे त्याने चौकशीत सांगीतले असून उपअभियंता संदिप निरंजन यांच्या तक्रारीवरुनऔद्योगीक वसाहत पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता संशयीताला ३ दिवस पेालिस कोठडी सुनावण्यात आली.

दुसराही अटकेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी आनंद सिंग पाटील,हेमंत कळसकर अतुल पाटील, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर सचिन पाटील मुकेश यांच्या पथकाने संशयीत बाळू सैंदाणे याला आयोध्यानगरातून ताब्यात घेतले असून चौकशी अंती त्याला अटक होवून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संपादन - रईस शेख 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT