सचिन जेाशी  
जळगाव

चांदी अकरा हजारांनी फिकी..सोने पाच हजार घसरले

सचिन जेाशी

जळगाव, : गेल्या चार-सहा महिन्यांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यातील दरवाढीने उच्चांक गाठला. मात्र काल एकाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल अकरा हजारांनी घसरण होऊन ती ७५ हजारांवरुन ६४ हजारापर्यंत खाली आली. तर सोन्याचा दरही ५८ हजारांवरुन ५३ हजार ५०० पर्यंत खाली आला. एकाच दिवसात एवढी मोठी घसरण होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, असे सांगितले जात आहे. 
जगभरात वाढलेला कोरोनाचा संसर्ग, अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी व चढ-उतार या घटनांच्या पाश्‍र्वभूमीवर गेल्या साधारण सहा महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने दरवाढ होत होती. स्वाभविकत: या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा कल वाढला. त्यातच गेल्या आठवडाभरात दररोज पाचशे- हजार, दोन हजार या प्रमाणात सोने- चांदीच्या दरात वाढ झाली होती. 

दिवसातील विक्रमी घसरण
ही सातत्यपूर्ण भाववाढ होत असताना शनिवारी जळगावच्या बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतितोळा सुमारे ५८ हजार ५०० (जीएसटीसह) तर चांदीचा भाव प्रतिकिलो ७५ हजारांपर्यंत होता. मात्र, सोमवार व मंगळवारी पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ होऊन मंगळवारी सोन्याच्या दरात पाच हजारांनी तर चांदीच्या भावात तब्बल अकरा हजारांनी घसरण होऊन सोने ५३ हजार ५०० तर चांदीचा भाव ६४ हजार रुपयांपर्यंत खाली आला. 


देालायमान स्थीती
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक स्थिती त्याला कारणीभूत होती. मात्र, दोन दिवसांत अचानक सोने- चांदीच्या दरात कमालीची घसरण झाली. सोने- चांदीचे मार्केट आणखी काही महिने असे दोलायमान राहणार असून गुंतवणूकदारांनी जास्त प्रमाणात गुंतवणूक न करतायात २० ते ३० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करणे योग्य राहील. 
- स्वरुप लुंकड (सचिव, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT