Sweep to bank account by sending link on mobile..courier customer care call for Rs 50,000 
जळगाव

मेाबाईलवर लिंक पाठवून बँक खात्यात मारला झाडू..कुरीयर कस्टमर केअरचा कॉल पडला ५० हजारात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः-  ॲक्सीस बँकेकडून घेतलेल्या कार लोन फेडल्याचे प्रमाणपत्र कुरिअरने पाठवले होते. त्याची चौकशी करण्यासाठी गुगलवरुन ब्लू-डॉट कुरिअरचा कस्टमर केअर नंबर मिळवून संपर्क केल्याने संबधीत भामट्याने दीपक रमेश नेरकर यांच्या बँक खात्यातून चक्क ४९ हजार ९९८ रुपये लंपास केल्याची घटना घडली. बँकेचे क्रेडीटकार्ड ब्लॉक करून या प्रकरणी नेरकर यांनी शहर पेालिसांत तक्रार दिल्यावरून अज्ञात भामट्यांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरातील दत्तात्रय नगर येथील रहिवासी दीपक रमेश नेरकर (वय-४५) हे धरणगाव आयटीआय मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ॲक्सीस बँकेकडून कार लोन घेतले व ते पूर्ण फेडलेही होते. मात्र, कर्ज फेडल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसल्याने त्यांनी बँकेला संपर्क केला. बँकेने तुमचे प्रमाणपत्र, ब्लू-डॉट कुरीयरने रवाना झाले असून त्यांना संपर्क करण्यास सांगितले. नेरकर यांनी तत्काळ ब्लूडॉट कुरीयरला संपर्क करण्यासाठी गुगल सर्च इंजिनवरुन नंबर शोधत संपर्क केला. संबंधित व्यक्तीने (http//onlineouriesrvice.online/) या लिंकवर क्रिेडीट कार्डाद्वारे १० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. नेरकर यांनी लिंकवर दहा रुपये अदा करताच त्यांच्या खात्यातून २४ हजार ९९९ रुपयांचे दोन वेळेस विड्रॉल करण्यात येऊन चक्क ४९ हजार ९९८ रुपये काढून घेण्यात आले. घडला प्रकार लक्षात येताच दीपक नेरकर यांनी ॲक्सीस बँकेला फोन करून कार्ड ब्लॉक केले. शहर पेालिस ठाण्यात तक्रार दिपल्यावरून अज्ञात भामट्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि माहिती व तंत्रज्ञात अधिनियमाअंतर्गत (सायबर क्राईम) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सहा दिवसांत ३ घटना
शहरात अवघ्या सहा दिवसांत याच पद्धतीने लिंक पाठवून त्यावर संपर्क केल्यानंतर एक महिला डॉक्टर, एक उच्चशिक्षीत नोकरदार यांसह आयटीआय कर्मचारी अशा तीन लोकांची फसवणुक करण्यात आली आहे. महिला डॉक्टरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात, दुसरी तक्रार रामानंदनग पोलीस ठाण्यात आणि तिसरा गुन्हा शहर पेालिस ठाण्यात दाखल  करण्यात आला आहे. खात्यात झाडू मारणारे सायबर गुन्हेगार दिल्ली, झारखंड, बिहार आणि राजस्थान परप्रांतातील असण्याने सहजासहजी ते सापडून येत नाही. परिणामी स्थानिक पोलीस  ठाणेही त्यांना शोधायची तसदी घेत नसल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले.

गुगलचे नोटीफीकेशन
भारतात गुगल कुठलेही कस्टमर केअर सर्विसचे नंबर उपलब्ध करून देत नाही, दिसणारे नंबरचा वापर करू नये असे स्पष्ट पणे उल्लेक आढळून येतो. (does not hav a customer care number in india do not caal the fraud & loose money) ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी, ग्राहकांनी खबरदारी पाळावी असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याकडूनही वारंवार करण्यात येत असताना एका मागून एक घटना समोर येत आहे.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT