पेालिसावर तडी  
जळगाव

जमावाच्या तावडीतून चोरला सोडविणाऱ्या पेालिसावर तडी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः- शहरातील भिलपुरा चौकात संध्याकाळी एका घरात चोरटा घरात शिरला..पब्लिकने पकडून चेाप दिला..पब्लिक मार पडत असताना मुख्यालयात नोकरीला असलेल्या पोलीस  दादा पेालिसगीरी दाखवायला उतरला, त्यालाही दोन हात खावे लागले. मात्र, या पोलिसाने चेाराला पळवून दिले. नंतर चोर पकडणाऱ्या तरुणावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आल्याचा नवल प्रकार समोर आला आहे.  

जळगाव शहरातील सर्वाधिक संवेदनशील परिसर म्हणून पेालीस दरबारी भिलपुरा-इस्लामपुरा भागाची नोंद आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजता एका घरात चेारटा शिरला..महिलेने त्याला हटकले  व चोर..चोर अशा आरोळ्या मारल्याने परिसरातील तरुणांनी धाव घेतली. पळत जाऊन चोरटा एका धार्मिक स्थळात शिरल्यावर त्याला आठ-दहा तरुणांनी काढून बेदम चोप दिला. चोरट्याला मारहाण होत असताना..मुख्यालयात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी जाकीर शेख जाफर तेथे आले. मारहाण होत असलेल्या तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवताना..एकदोन त्यांनाही खाव्या लागल्या. साध्या वेशातील या हवालदाराला मार बसला म्हणून चोराची सुखरूप सुटका झाल्याने तो पळून गेला. मात्र, पेालीसावर हात उगारला म्हणून चोर पकडणाऱ्या जाकीर नुरमोहम्मद या तरुणावरच कारवाई झाली. घडला प्रकार जमावाने पेालीस ठाण्यात येऊन सांगितला मात्र, तरी चोरटा पळाला याबाबत प्रभारी पेालीस निरीक्षकांनीही दखल घेतली नाही. अखेर चोर पकडणाऱ्या तरुणाला कारवाईला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे चोराला सोडवणारा पेालीस मुख्यालयात नोकरीला असून भिलपुरा चौकात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी तो आल्याचे त्याने वरिष्ठांना सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT