पोलिस ठाण्यात तरुणाने घेतले किटकनाशक 
जळगाव

पोलिस ठाण्यात तरुणाने घेतले किटकनाशक

रईस शेख

जळगाव,-ः  एकतर्फी प्रेमातून तरूणीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाने गुन्हा दाखल होण्यच्या भितीने पोलीस ठाण्यातच किटकनाशक प्राशन केल्याचा प्रकार दुपारी घडला. घडल्या प्रकारानंतर पेालिस ठाण्यात एकचगोंधळ उडून बेशुद्धावस्थेत या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  

यावल तालूक्यातील तरुण-तरुणी सोबत शिक्षण घेत होते. शिक्षणा दरम्यान ओळख होती. नुकतेच चार महिन्यापुर्वी या तरुणीचा विवाह होवुन ती जळगावी सासरी आली आहे. एकतर्फी प्रेमातुन या तरुणाकडून तिला त्रास दिला जात होता, मात्र तीने दुर्लक्ष केले.मात्र, या सनकी तरुणाने चक्क तिच्या दिराला व पतीला फोन करुन खोटी माहिती दिली. इतकेच नाही तर कॉलेजचे फोटो सासरच्या मंडळीना पाठवल्याने पिडीत विवाहीतेने थेट पेालिस ठाणे गाठून या बाबत तक्रार दिली होती.   

किटक नाशक प्राशन
आज दुपारी पोलिस ठाण्यात आल्यावर सार रावते याची निरीक्षक अनिल बडगुजर यांनी विचारपुस करुन चौकशी केली.घडल्या प्रकारा बाबत सांगुन त्याला गुन्हा दाखल करण्यात बाबत सांगीतल्यानंतर तो, केबिन मधुन बाहेर निघाला आणि खिश्‍यातून किटकनाशकाची बॉटल काढून प्राशन केली.  प्रसंगावधान राखत निरीक्षक बडगुजर यांच्यासह कर्मचाऱ्यानी तत्काळ या तरुणाला जिल्‍हा आयुर्वेदीक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. संध्याकाळ पर्यंत या तरुणाची प्रकृती धोक्या बाहेर गेल्यानंतर सहाय्यक निरीक्षक मनोज राठेाड यांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.  

तरुणीची तक्रार ; दोन गुन्हे
पिडीत विवाहीतेने संध्याकाळी तक्रार दिल्यावरुन सागर दगडू रावते व त्याच्या सोबत सुमीत पाटील यांच्या विरुद्ध विनयभंग, माहिती व तंत्रज्ञान अधीनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सोबतच आत्महत्त्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्ह्याची दाखल करण्यात आली. 
-------पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT