वन्यप्रेमींनी उभारली पक्षांसाठी कृत्रिम घरट्यांची वसाहत .  
जळगाव

निवारा हिरावलेल्या पक्षासाठी वन्यप्रेमींनी उभारली कृत्रीम घरट्यांची वसाहत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, - वरणगाव येथील तपत कठोरा येथे ग्रामपंचायती शेजारील चिंचेचा विशाल वृक्ष असून त्यावर गायबगळे, चिमण्यांसह असंख्य पक्षांची वसाहत आहे. दोन दिवसांपूर्वी काही ग्रामस्थांनी या वृक्षावर कुऱ्हाड चालवून तोडले. परिणामी वृक्षावरील पक्षांचे घरसंसार उध्वस्त होऊन २५ पक्षांचा मृत्यू झाला तर असंख्य अंडीचे नुकसान झाले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही घटना कळताच त्यांनी निवारा हिरावलेल्या पक्षांसाठी कृत्रिम घरट्यांची वसाहत निर्माण केल्याचा दिलासादायक काम केले आहे.

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या अन्न, वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत, प्राणी व पक्षांना वस्त्र नाही तर सुरक्षित आधीवास अपेक्षीत असतो. वरणगाव ग्रामपंचायती शेजारील चिंचेचा जुनावृक्ष अशीच सुरक्षित वसाहत हेाती. पक्षांची विष्ठा पडते म्हणून असंख्यपक्षांची घरटी असलेल्या या वृक्षावर काही ग्रामस्थांनी कुऱ्हाड चालवली. वृक्ष तोडताना २५ नवजात गायबगळ्यांचा त्यात मृत्यू झाला. असंख्य अंडी खालीपडून फुटली, सर्व घरटी तुटल्याने निराधार झालेल्या पक्षांचा किलबिलाट सुरू असतांनाच वन्यजीव संरक्षण संस्थेचे भूषण कोळी, बाळकृष्ण देवरे यांनी मदतीला धाव घेतली. सोबतच सतीश कांबळे,दीपक नाटेकर, वैभव बच्छाव, रवी तायडे, विजय रायपुरे, लिनत जंगले अशांनी निराधार जखमी पिलांना उचलून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आले. काही पक्षांवर प्रथमोपचारही करण्यात आले.पक्षांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर वन अधीनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी वन्यजीव संस्थेतर्फे करण्यात आली आहे. 

पक्षांसाठी नवी वसाहत 
चिंचेच्या झाडावरील शंभर दीडशे घरटी तेाडल्याने निराधार झालेल्या गायबगळ्यांचा कलकलाट सुरू असतांनाच वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही तासातच बांबूच्या टोपल्या उपलब्ध करून शेजारील बाभळीच्या झाडावर या निराधार पिलांसाठी सुरक्षित घरटी तयार करण्यात आली.नवजात पक्षांना या घरट्यांमध्ये ठेवण्यात आल्यानंतर देानच दिवसात पक्षांच्या समूहाने वन्यजीव संस्थेने तयार करून दिलेल्या कृत्रिम घरट्यांच्या वसाहतीला स्वीकारले असून रहिवासही सुरू केला आहे.    

संपादन - रईस शेख
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT