Young man  
जळगाव

देान लेकरं पत्नी देखत..तरुण पाण्यात गेला वाहून

रईस शेख

जळगाव,- कुटुंबीयांसोबत दुचाकीवर कांताईबंधाऱ्यावर फिरणासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली. साप्ताहिक सुटी म्हणून पती-पत्नी दोघा मुलांना घेऊन कांताई बांधणाऱ्यावर छोटेखानी पिकनीक साठी आले होते. सोबत आणलेल्या डब्यातून जेवण आटोपल्यावर तटावर डबा धूत असताना पाय घसरून पडल्याने तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली.  तरुणाचा शेाध घेण्याचे कार्य रात्री पर्यंत सुरु होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेश मोरे (वय-२२, रा. पाळधी ता.धरणगाव) हे जैन इरिगेशन कंपनीत एसडब्ल्यूआर इलेक्ट्रिक विभागात गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. आज साप्ताहिक असल्याने विरंगुळा म्हणून पत्नी दोन्ही मुलांना सोबत घेऊन पिकनीकसाठी दुचाकीने कांताईबंधाऱ्यावर आले होते. बंधाऱ्याच्या निसर्गरम्य परीसरा पाहून झाल्यावर मोरे दाम्पत्याने मुलांसह सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. जेवणानंतर डबा धुण्यासाठी कांताई बंधाऱ्याच्या किनाऱ्यावरून मुकेश मोरे खाली उतरले. डबा धुतांना त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते वाहत्या पाण्यात पडले. पाण्याचा वेग जास्त असल्याने ते प्रवाहात वाहून गेल्याची घटना दुपारी १२ः३० वाजता घडली. डोळ्या देखत पती वाहून जात असल्याचे दिसताच सौ. मोरे यांनी आरडाओरड केल्याने बंधाऱ्यावरील तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तो पर्यंत मुकेश खोल पाण्यात दिसेनासे झाले. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील, पाळधी गावाचे दोन्ही  सरपंच सोपान पाटील (खुर्द), चंद्रकांत पाटील(बु.) यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळावर धाव घेतली.तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मृतदेहाचा शोध घेत होते. अंधारानंतर शेाधकार्य थांबवावे लागणार असल्याचे उद्या सकाळीच मुकेश मोरेचा मृतदेह सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT