Crime News sakal
जळगाव

जळगाव : दारू पिणाऱ्यांना हटकणे महागात

मेहरुण ट्रॅक खून प्रकरणी एक जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मेहरूण तलाव काठावरील फार्म हाऊसच्या भिंतीला लागून दारू पीत असलेल्या तरुणांना हटकल्याच्या कारणावरून दिनेश पाटील (वय ४४ रा. रामेश्वर कॉलनी) यांचा वाद होऊन हाणामारी झाली. त्यातूनच त्यांना दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडल्याचे दिसून येत आहे.

दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय २१, रा. तांबापूर) याच्यासह विधीसंघर्षीत बालकांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश पाटील शनिवारी (ता. ९ ) मेहरूण तलावाजवळील फार्म हाऊसजवळ असलेल्या एका नाल्याजवळ दुचाकी (एमएच १९ बीएक्स १४९७) ने आले आणि दारू पिण्यासाठी बसले.

त्याच ठिकाणी बाजूला दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (वय २१, रा. तांबापूर) आणि एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील दारू पीत बसले होते. त्यावर दिनेश पाटील यांनी ‘एवढ्या लहान वयात दारू पिताय तुम्ही उठा येथून’ असे हटकले.

याचा राग आल्याने दोघांनी त्यांना दगडाने ठेचून खून करून पसार झाले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोघांना न्यायालयात हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT