Sheikh Rahim, President of Jikra Education Society, welcoming Minister Girish Mahajan during the Iftar Party. esakal
जळगाव

Jalgaon Girish Mahajan : इफ्तार पार्टीमुळे एकोपा वाढण्यास मदत : गिरीश महाजन

Jalgaon News : रमझान महिन्यातील धार्मिक वातावरणामुळे न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लागते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृध्दींगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीला महत्त्व आहे.

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : रमझान महिन्यातील धार्मिक वातावरणामुळे न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लागते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृध्दींगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीला महत्त्व आहे. सामाजिक व जातीय सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शहरातील जिकरा एज्युकेशन सोसायटी तर्फे झालेल्या इफ्तार पार्टीत बोलत होते. (Jalgaon Minister Girish Mahajan)

जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, बाबुराव हिवराळे, शंकर राजपूत,आतिश झाल्टे, न्याजु शेठ, शेख खलिल, मुश्ताक शेख, अनिस शेख, शेख नाजिम शेख वजीर, रिझवान शेख, जिकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेख रहीम, सचिव शेख जाकिर, त्याच प्रमाणे शहरातील हिंदू मुस्लिम बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाच कर्तव्यांचे पालन

महाजन म्हणाले की, 'रमजान' पर्वाला इस्लाम धर्मात महत्त्व आहे. या महिन्यात विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. (latest marathi news)

यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मूलभूत पाच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात.

रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुर्चिभूत वळण लाभत. मन एकाग्रतेला फार उपयोग होतो. सर्व धर्मात एकात्मतेची व समानतेच्या जाणीवेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. सर्व जाती धर्मातील घटकांत शांती, सुरक्षितता कायम राखण्यासाठी सुद्धा इफ्तार पार्टीची विशेष सहकार्य व मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT