Missing Case esakal
जळगाव

Jalgaon Missing Cases : ग्रामीण भागात वाढले ‘सैराट’! मेहुणबारे हद्दीतून तीन वर्षांत 103 मुली, महिला बेपत्ता

Latest Jalgaon News : येथील पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विविध कारणांनी घरातून पलायन केलेल्या तब्बल १०३ महिला व युवतींमध्ये काही शालेय विद्यार्थिनी देखील आहेत.

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘हम बने तुम बने एक दुजे के लिए’ म्हणत ‘सैराट’ होण्याचे प्रमाण शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दिसून येत आहे. यात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींचाही समावेश आहे. ज्यामुळे त्यांचे आई- वडील हतबल झाले आहेत.

येथील पोलिस ठाण्यात उपलब्ध नोंदीनुसार, तीन वर्षांत तब्बल १०३ मुली व महिला ‘सैराट’ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विविध कारणांनी मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद असून यात सर्वाधिक प्रमाणे हे कोणासोबत तरी पळून जाण्याचे आहे. यातील काही जण विवाहबद्ध होऊन परत देखील आले आहेत. (Missing Cases increased in rural areas)

सध्या घरातून पळून जाणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आता तर तुरळक लोकसंख्या असलेल्या गावांमधूनही अशा अशा घटना घडताना दिसून येत आहेत. येथील पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विविध कारणांनी घरातून पलायन केलेल्या तब्बल १०३ महिला व युवतींमध्ये काही शालेय विद्यार्थिनी देखील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १०३ बेपत्ता झालेल्या महिला व मुलींपैकी केवळ ६५ जणी मिळून आल्या असून ३८ अद्यापही बेपत्ता आहेत. यात २८ मुलींचा समावेश आहे.

पळून गेल्यानंतर काय?

प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सोपे असल्याने अनेक जण आपल्या प्रियकराच्या भूलथापांना बळी पडल्याचे चौकशीअंती दिसून आले आहे. आश्‍चर्य म्हणजे, विवाह झालेल्या महिला देखील आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या आहेत.

पळून जाणारे बहुतांश जोडपे एक तर बाहेरगावी लॉजमध्ये राहतात किंवा नातेवाईकांकडे जातात. त्यानंतर कुठे तरी कामाच्या शोधात निघून जातात. मात्र, काही दिवसांतच जवळचे पैसे संपल्यानंतर विशेषतः मुलीला संसाराचे चटके बसू लागल्यावर आपण किती मोठी चूक करुन बसलो, याचा पश्‍चाताप होतो. अनेकांना घरी परतण्याची इच्छा असूनही घराची वाट धरता येत नसल्याचे येथील पोलिसांना चौकशीतून बऱ्याचदा दिसून आले आहे. (latest marathi news)

मुलामुलींचे मित्र व्हावे

बऱ्याचदा मुली वयात येताना अधिक भावनिक होत असतात. त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्यांना एकमेकांविषयीचे शारीरिक आकर्षण होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. यातून अनेक अल्पवयीन मुली बळी पडतात. याशिवाय टीव्हीवरील सिरीयल्स, चित्रपट आणि सोशल मीडियाच्या अती वापरामुळे देखील प्रेम प्रकरणे खूपच वाढल्याचे पोलिसांना चौकशीअंती दिसून आले आहे.

मात्र, हे शारिरिक आकर्षण क्षणिक असल्याचे जेव्हा मुलींच्या लक्षात येते. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या मुलामुलींचे मित्र व्हावे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

"लहान मुलींनी कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नये. कोणी त्रास देत असल्यास आपल्या शिक्षकांना अथवा पालकांना लगेचच सांगावे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांचे योग्य असे समुपदेशन करावे. तातडीच्या प्रसंगी पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर कॅाल करावा. घरातील वातावरण आनंदाचे असेल आणि पालकांचे आपल्या मुलामुलींशी मैत्रीपूर्ण नाते असेल तर अशा घटनांना आळा बसू शकतो."-

प्रवीण दातरे, सहायक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT