Eknath Khadse esakal
जळगाव

Jalgaon Eknath Khadse : खडसेंचा दिल्ली दौरा अन् भाजप प्रवेशाची चर्चा

Jalgaon News : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे रविवारी (ता. ३१) रात्री अचानक दिल्लीला गेले आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे रविवारी (ता. ३१) रात्री अचानक दिल्लीला गेले आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. खडसेंनी मात्र त्याचा इन्कार करत सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाच्या संदर्भात कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आपण तातडीने दिल्लीत आल्याचे स्पष्ट केले. (Jalgaon MLA Eknath Khadse suddenly went to Delhi and discussion of his joining BJP started)

रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी घोषित होण्याच्या आधीपासूनच एकनाथ खडसेंच्या भाजपतील प्रवेशाची चर्चा सुरू होती. अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा विषय त्या वेळी चर्चेत आला. शहांचा युवा संवाद कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांतच रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाली.

त्यामुळे खडसेही भाजपमध्ये जातील, असे बोलले जाऊ लागले. त्यातच खडसे रविवारी रात्री अचानक राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघाले. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया पुन्हा उंचावल्या. (latest marathi news)

सोमवारी (ता. १) दिवसभर खडसेंच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या भाजपतील घरवापसीची चर्चा जिल्ह्यात रंगली होती. खडसेंच्या भाजपतील प्रवेशाच्या अटीवरच रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याचा तर्क लढविला जात असून, त्यादृष्टीनेही ही चर्चा होत आहे.

"दिल्लीला सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाच्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलो आहे. काम झाल्यानंतर सायंकाळी लगेच राजधानी एक्स्प्रेसनेच जळगावकडे निघणार आहे. भाजप प्रवेशासंबंधी चर्चांमध्ये काहीही दम नाही."- एकनाथ खडसे, विधान परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT