MP Raksha Khadse speaking at Mahayuti workers meeting. MLA Sanjay Savkare on the platform
MP Raksha Khadse speaking at Mahayuti workers meeting. MLA Sanjay Savkare on the platform esakal
जळगाव

Jalgaon News : कॉंग्रेसने पदे वाचविण्यासाठी संविधानात केला बदल : आमदार संजय सावकारे

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कॉंग्रेसच्या काळात ८५ पेक्षा जास्त वेळा संविधानात बदल करण्यात आला. जनतेच्या हितासाठी क्वचित व स्वतःची पद वाचविण्यासाठी जास्त वेळा बदल करण्यात आला, असा आरोप आमदार संजय सावकारे यांनी केला. येथील स्टार लॉन्समध्ये झालेल्या महायुतीच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांची अनुपस्थित खटकली. (Jalgaon MLA Sanjay Savkare statement Congress changed constitution to save posts)

भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी), शिवसेनेचे शहराध्यक्ष पवन नाले, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, सुदाम सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार सावकारे म्हणाले, की खरेतर कॉंग्रेसनेच संविधान धोक्यात आणले. उलट पंतप्रधान मोदींनीच देश कोणत्याही धर्मग्रंथाच्या आधारावर नव्हे, तर संविधानाच्या आधारावर चालतो, हे सांगितले. (latest marathi news)

मोदींच्या काळात संविधात काही बदल झाले, ते जनतेच्या भल्यासाठी होते. यात ३७० कलम हटविणे, तीन तलाक पद्धत रद्द करणे आदींचा समावेश होता.

रक्षा खडसे म्हणाल्या, की पंतप्रधान मोदी यांच्या ‘व्हिजन’मुळे भारतात अनेक बदल झाले. डिजिटल क्रांती घडवून आली. त्याचा फायदा अनेक क्षेत्रात झाला. गरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उमेश नेमाडे, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, सुदाम सोनवणे, लक्ष्मण जाधव आदींची भाषणे झाली. भाजपचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT