fraud Sakal
जळगाव

Jalgaon Money Fraud : चाळीसगावातील बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रात वाहन कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची एक कोटी ३० लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एकाविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी, नाशिक) यांनी वाहन घेण्यासाठी येथील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत बनावट कागदपत्रे खरी भासवून सादर केली. बॅंकेच्या शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी अजय सिंग व प्रोसेसिंग अधिकारी मंदार देशमुख यांनी या कागदपत्रांची खात्री न करता, सुशील पाटील यांना वाहन कर्जासाठी एक कोटी ३० लाख रुपये मंजूर केले.

कर्जदार पाटील यांनी बॅंकेला सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर बॅंकेची फसवणूक झाली, म्हणून वरील तिघांविरुद्ध बॅंकेतर्फे निशांत इलमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: बीडमध्ये राडा! लक्ष्मण हाके अन् पंडितांचे कार्यकर्ते समोरासमोर; हाकेंनी दिल्या थेट शिव्या

Latest Marathi News Updates: गणोरीत वन्य प्राण्यामुळे मका पिकाचे नुकसान

Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Mutual Fund Tips: महिलांसाठी म्युच्युअल फंड: छोट्या गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं?

नवा अंदाज, नवी जोडी! सुबोध भावे आणि मानसी नाईक घेऊन येतायत ‘सकाळ तर होऊ द्या’! दोघांचं ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं!

SCROLL FOR NEXT