A caged monkey. esakal
जळगाव

Jalgaon News : धुमाकूळ घालणारे माकड जेरबंद; अनेकांना घेतला होता चावा

Jalgaon : गावात गेल्या अनेक दिवसांपासून उच्छांद मांडणाऱ्या व आतापर्यंत सात ते आठ जणांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या माकडाला अखेर वन विभागाने आज जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गावात गेल्या अनेक दिवसांपासून उच्छांद मांडणाऱ्या व आतापर्यंत सात ते आठ जणांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या माकडाला अखेर वन विभागाने आज जेरबंद केले. गावात या माकडाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माकडाला पिंजऱ्यात पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. गावात दहा ते बारा दिवसांपासून दहा- बारा माकडे दाखल झाली आहेत. त्यांच्या टोळीतील एक माकड काहीसे जखमी झाले होते. त्याच्या डोक्यावर जखमेची कोरडी खूण असून हे माकड अचानक कोणाच्याही अंगावर धावून जायचे. (monkey which bit seven to eight people and injured them was finally jailed by forest department )

हे माकड चवताळल्यासारखे करीत असल्याने त्याची प्रचंड भीती निर्माण झाली होती. या माकडाने आतापर्यंत आठ ते दहा जणांना चावा घेऊन जखमी केले होते. गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सातच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्रामागे सीताबाई चौधरी या वयोवृद्ध महिला रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर माकडाने उडी मारुन पाडले. ज्यात त्या जखमी झाल्या होत्या. माकडाने केलेल्या हल्ल्यात सुरेश सोनार, गोरख कोळी, भास्कर पाटील, कैलास ठोके यांच्यासह वरखेडे तांडा येथील एक जण तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या बाहेरगावच्या एकावर या माकडाने हल्ला करुन त्यांना चावा घेतला होता.

पिंजऱ्यात अडकवले

या माकडाचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दखल घेऊन शुक्रवारी (ता.४) पाचोरा येथील वन्यप्रेमी आतिष चांगरे यांना मेहुणबारेत पाठवले. त्यांनी चिंचेच्या झाडावर बसलेल्या माकडाला मोठ्‍या शिताफीने पिंजऱ्यात अडकवले. वन विभागाने हे माकड ताब्यात घेतले असून माकडाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Astrology : विधानसभा बरखास्त होण्याचा अंदाज ते अन्य राज्यातील सरकारं अस्थिर होण्याची शक्यता...काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य?

Latest Marathi News Updates : कालव्याचं काम ४५ वर्षांपासून सुरू, ग्रामस्थांकडून आमरण उपोषण

Mumbai Indians, RCB च्या खेळाडूंसह १३ भारतीयांची वेगळी वाट! परदेशातील लीगच्या ऑक्शनसाठी नोंदवली नावं

ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रिया जेलरच्या डोळ्यात धूळ फेकून तुरुंगाबाहेर, अश्विन पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार

Ganesh Chaturthi 2025 Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

SCROLL FOR NEXT