Moon-Saturn Pidhanyuti esakal
जळगाव

Pidhanyuti : चंद्र-शनीच्या ‘पिधानयुती’चा 14, 15 च्या रात्री आविष्कार! खगोलप्रेमींसाठी ठरणार पर्वणी

Latest Jalgaon News : प्रेक्षणीय चमत्काराचा पूर्ण आनंद येत्या १४ व १५ ऑक्टोबरला खगोलप्रेमींना घेता येणार आहे. सोमवारी (ता. १४) रात्री अकरा वाजून ५० मिनिटांनी शनी चंद्रामागे जायला सुरुवात होईल.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चंद्र आणि शनीच्या पिधानयुतीचा अद्‌भुत आणि प्रेक्षणीय चमत्काराचा पूर्ण आनंद येत्या १४ व १५ ऑक्टोबरला खगोलप्रेमींना घेता येणार आहे. सोमवारी (ता. १४) रात्री अकरा वाजून ५० मिनिटांनी शनी चंद्रामागे जायला सुरुवात होईल. (Moon Saturn Pidhanyuti invented on night)

१५ ऑक्टोबरच्या पहाटे बारा वाजून ५९ मिनिटांनी शनी चंद्राच्या मागून बाहेर यायला सुरुवात होईल आणि रात्री एक वाजून तीन मिनिटांनी शनी पूर्णपणे बाहेर आलेला असेल. तब्बल एक तास नऊ मिनिटे शनी चंद्रामागे लपलेला असेल. ही पिधानयुती दक्षिण आफ्रिका आणि आशियात दिसणार आहे.

पिधानयुती म्हणजे काय?

आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती आहे. मात्र, पिधानयुती हे पण एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला, की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, की चंद्रग्रहण होते, तसेच चंद्र ज्या वेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, त्या वेळी तो तारा किंवा ग्रह चंद्रामागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. (latest marathi news)

याला पिधानयुती (Occultation) असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, पण क्वचित प्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्‍भुत आणि प्रेक्षणीय चमत्कार बघायला मिळतो.

वास्तवात आकाराच्या मानाने बघितले तर शनी हा चंद्रापेक्षा खूप मोठा आहे, पण अंतराच्या मानाने बघितले तर चंद्र व शनी आणि इतर ग्रहांपेक्षा पृथ्वीच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे चंद्र आपल्याला इतर सर्व ग्रहांपेक्षा आकाराने मोठा दिसतो. चंद्र ज्या वेळी एखाद्या ग्रहासमोरून जातो, त्या वेळी तो ग्रह काही काळासाठी दिसेनासा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT