crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : इन्स्टाग्रामवर ओळखीतून विधवेशी घरोबा; लग्नाचे वचन देत 2 मुलांच्या आईवर अत्याचार

Jalgaon Crime : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २३ वर्षीय विधवेसोबत इन्स्टाग्रामवर ओळखी करून लग्नाचे वचन देत स्वतंत्र खोली करून घरोबा केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २३ वर्षीय विधवेसोबत इन्स्टाग्रामवर ओळखी करून लग्नाचे वचन देत स्वतंत्र खोली करून घरोबा केला. मात्र, लग्न न करता ऐनवेळी पळ काढणाऱ्या तरुणावर बुधवारी (ता. १) अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. २३ वर्षीय महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. ८ मार्च २०२३ ला महिलेची ओळख विकास प्रकाश अडकमोल (रा. गेंदालाल मिल) याच्याशी झाली. ()

विकासने महिलेचा ओळखीचा गैरफायदा घेत जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाने आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अडकमोल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्रामवर मैत्री

महिलेच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले. सोशल मीडियावर दोन मुलांची आई असलेल्या विधवेची ओळख गेंदालाल मिलमधील विकास अडकमोल याच्याशी झाली. ओळखीतून भेटीगाठी झाल्या. विकासने विधवेस लग्नाचे वचन देत दोन्ही मुलांची जबाबदारी घेण्याचे कबूल केले. स्वतंत्र रूम करून दोघेही सोबत राहू लागले. तिने लग्नासाठी विचारणा केल्यावर विकासने पळ काढला.

संशयित अटकेत

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दयानंद सरवदे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, प्रदीप पाटील, विशाल कोळी, ललित नारखेडे यांनी विकास याला रात्री गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी (ता. २) जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलिस कोठडीत त्याची रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Mumbai Crime: बॉस समजून पैसे पाठवले, पण घडलं विचित्रच; फसवणुकीतील ५.७५ कोटी रोखले, दिल्लीतून पाच जण अटकेत

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

Shivajirao Adhalrao Patil : आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार

SCROLL FOR NEXT