Well esakal
जळगाव

Jalgaon News: मुलीला शाळेत घ्यायला गेलेली आई सापडली विहिरीत! अज्ञात महिलेने संमोहित करून नेल्याचा कुटुंबाचा आरोप

Jalgaon News : शुद्धीवर आल्यानंतर विहिरीतील अंधार आणि खाली गाळात रात्रभर काढल्यानंतर दिवस उजाडल्यापर्यंतची माहिती त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मोहाडी रोडवरील नेहरूनगरातील २६ वर्षीय गृहिणी मुलीला शाळेतून आणायला घरातून बाहेर पडली. मात्र, शाळेत न पोचता ती थेट दुसऱ्या दिवशी विहिरीत मिळून आल्याने गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी महिलेस विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अज्ञात महिलेने डोक्यावरून हात फिरवून संमोहित केल्याचे या महिलेने सांगितले. दीपिका दीपक पाटील असे महिलेचे नाव आहे. (Jalgaon mother who went to take girl to school found in well)

दीपिका पाटील सोमवारी (ता. २४)नेहमीप्रमाणे दुपारी एकला मुलीला शाळेतून आणायला गेल्या. शाळेकडे जात असताना, वाटेतच त्यांना भुरळ पडली. संमोहित केल्याप्रमाणे त्या मिळेल त्या वाटेने निघून गेल्या. थेट विहिरीत पडल्या. शुद्धीवर आल्यानंतर विहिरीतील अंधार आणि खाली गाळात रात्रभर काढल्यानंतर दिवस उजाडल्यापर्यंतची माहिती त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली.

कुटुंबीयाकडून रात्रभर शोध

दीपिका यांच्या मुलीला घेण्यास शाळेत कोणीही आले नाही, म्हणून शाळेतून मुलीच्या वडिलांना फोन करण्यात आला. त्यांनीही मुलीची आई शाळेतच गेल्याचे सांगितले. नंतर दीपक पाटील यांनी काकूंना मुलीला शाळेतून आणण्यासाठी पाठविले. सायंकाळ उलटूनही पत्नी सापडत नसल्याने दीपक पाटील व कुटुंबीयानी रात्रभर शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. (latest marathi news)

विहिरीत महिला अन्‌ धावपळ

शिरसोली येथील शेतकरी मुक्तार मुनाफ कुरेशी शेतात आले. विहिरीत पाणी पाहण्यासाठी डोकावल्यावर त्यांना आत महिला दिसून आली. तत्काळ त्यांनी पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिसांना कळविले. शिरसोली ग्रामस्थांनी दीपिका पाटील यांना विहिरीतून बाहेर काढले. एका ग्रामस्थाने त्यांना ओळखले.

तिच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. दीपिका पाटील यांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर काही तासांनी पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. भुरळ आल्याने निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी कुटुंबाकडून माहिती जाणून घेतली. कौटुंबीक कलहातून हा प्रकार घडला तर नसावा, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT