Jalgaon Sakal
जळगाव

जळगाव : खासदार, आमदारांसह दिग्गजांचे अर्ज दाखल

बुधवारी छाननी; ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा बँक (bank) संचालक मंडळ निवडणुकीसाठी खासदार, आमदार यांच्यासह अनेक दिग्गजांनी सोमवारी अर्ज दाखल केले. २१ जागांसाठी सोमवारी तब्बल १७४ अर्ज दाखल झाले. आजपर्यंत दाखल अर्जांची संख्या २७९ आहे. बुधवारी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची ८ नोव्हेंबर शेवटची मुदत आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी झाली होती.

सर्वपक्षीय पॅनल रद्द झाल्यानंतर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. भाजपतर्फे माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, करण पवार, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए. टी. पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, संजय पवार, आमदार अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, सचिन चौधरी, संगीता वाल्मिक पाटील, सोनल संजय पवार, राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, कैलास पाटील, इंदिराबाई पाटील आदींनी अर्ज दाखल केला.

काँगेसतर्फे राजीव पाटील, सुरेश श्‍यामराव पाटील, अविनाश भालेराव, उदयसिंग पाटील यांनी अर्ज भरले. शिवसेनेतर्फे श्‍यामकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, महानंदा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

गटनिहाय एकूण दाखल अर्ज

वि. का. सोसायटी : जळगाव ११, भुसावळ ८, यावल ७, रावेर ८, मुक्ताईनगर ७, बोदवड ६, जामनेर ६, पाचोरा ७, भडगाव ९, चाळीसगाव ९, पारोळा ४, अमळनेर ७, चोपडा १५, धरणगाव ४, एरंडोल ४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT