Wet, dry waste will be collected separately
Wet, dry waste will be collected separately esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : ओला, सुका कचरा वेगवेगळा संकलित करणार; प्रथम 4 प्रभागांत प्रायोगिक तत्वावर उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे आता ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित होणार आहे. प्रायोगिक तत्वावर चार प्रभागांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक-एक प्रभाग वाढविण्यात येणार आहे. डम्पींग ग्राऊंडवर वेगवेगळा कचरा टाकण्यात येणार असून, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. (Jalgaon Municipal cities Wet dry waste will be collected separately)

महापालिकेतर्फे घराघरांतून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र, ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येत नाही. आता ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्यात येणार आहे. कचरा वेगवेगळा संकलित करून त्यावर प्रक्रिया करणे सोपे होणार आहे. संकलित केलेला ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून त्यातील घटक वेगवेगळे केले जाणार आहेत.

त्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांर्गत एक-एक प्रभाग निवडण्यात येणार आहे. त्या चार प्रभागांमधील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा देणे बंधनकारक राहणार आहे. तेथून घंटागाडीचालक व हेल्परांकडून तो कचरा वेगवेगळा संकलित करून डम्पींग ग्राऊंडपर्यंत पोचविण्यात येणार आहे.

तेथे त्या कचऱ्यातून लोखंड, काच, रबर, इलेक्ट्रीक वस्तू व प्लॅस्टिक वेगवेगळे करून उर्वरित कचऱ्याचे कंम्पोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कंम्पोस्ट पीठ तयार केले जात असून, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झाल्यानंतर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. (latest marathi news)

जनजागृती मोहीम राबविणार

कचरा विलगीकरणासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून शहरातील सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. महापालिका व शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात कचरा वेगवेगळा देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी दोन कचरा कुंड्या ठेवून एका कुंडीत ओला, तर दुसऱ्यामध्ये सुका कचरा ठेवायचा असून, घंटागाडीत ओला व सुका वेगळा टाकायचा आहे.

"शहरातील कचरा संकलनाची पद्धत बदलण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी प्रायोगीक तत्वावर चार प्रभागांची निवड होणार आहे. लवकरच या विषयावर काम सुरू केले जाणार आहे." -पल्लवी भागवत, प्रभारी आयुक्त, महापालिका, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT