Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेचा नो-व्हेईकल डे ‘भातुकलीचा खेळ’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : भातुकलीच्या खेळात लग्न असते परंतु नवरा नवरीपासून सर्वच नकली असते. अगदी असाच प्रकार सद्या जळगाव महापालिकेच्या ‘नो-व्हेईकल डे’चे झाले आहे. नो-व्हेईकल डे असतो, परंतु अधिकारी कर्मचारी सर्वच वाहनांवर येतात,परंतु महापालिकेत वाहन आणत नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेर वाहन लावून महापालिकेच्या आवारात पायी येतात आणि नकलीच आपणही हा दिवस साजरा केला असे दाखवितात.

यामुळे उद्देश तर साध्य होतच नाही परंतु महापालिकेच्या प्रवेशद्वाराज‍वळ वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग मात्र दिसून येते. (jalgaon Municipal Corporation No Vehicle Day But parking for two wheelers and four wheeler was done near entrance of seventeen storey building news)

इंधनामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. ती हानी टाळून पर्यावरण वाचविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’पाळण्याचा निर्णय घेतला.

शहरातील नागरिकासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याची अंलबजावणी करावी आणि पर्यावरण रक्षणासाठी साथ द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. गेल्या दोन महिन्यापासून हे अभियान राबविण्यात येत आहे.

आज हा तिसरा महिना आहे. आजही महिन्याचा पहिला बुधवार असल्याने ‘नो-व्हेईकल डे’होता. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी जे झाले तेच आजही झाले.महापालिका सतरा मजली इमारतीचे आवार वाहनाशिवाय ओस होते. परंतु सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकी,चारचाकी वाहनांची पार्किंग लागली होती. अगदी रस्त्यापर्यंत वाहनांचे पार्किंग होते.

कर्मचाऱ्यांची वाहने प्रवेशद्वारावर

‘नो-व्हेईकल डे’उपक्रमात महापालिकेत येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी घरून येतांनाचा वाहन आणू नये असा उद्देश आहे. त्यांनी पायी यावे किंवा दोन ते तीन जणात रिक्षा शेअर करून यावे त्यामुळे इंधन बचत होईल, पर्यावरणही वाचेल हाच त्याचा उद्देश आहे.

परंतु या ठिकाणी अधिकारी व कर्मचारीच घरून दुचाकी वाहन घेऊन येताना दिसत आहे. ते वाहन महापालिकेत न लावता प्रवेशद्वारावर किंवा गोलाणी संकुलात पार्किंग करून आपल्या कार्यालयात जातात. नागरिक ही तेच करताना दिसत आहे.

बिचारे सुरक्षा रक्षक

‘नो व्हेईकल डे’असल्याने महापालिकेत कोणतेही इंधन वाहन आणू नये असे आदेश आहेत. परंतु काही अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक दुचाकी वाहन घेऊन येतच असतात. परंतु सुरक्षा रक्षक त्यांना वाहने महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या आवारात घेऊन जाण्यास नकार देतात.

परंतु काही नागरिक तसेच कर्मचारीही ऐकत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकासोबत हुज्जतबाजी झाल्याचेही दिसून येत आहे. बिच्चाऱ्या सुरक्षा रक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

‘डे’कशासाठी?

महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी जाहीर केलेल्या उपक्रमाबाबत अधिकारी, कर्मचारीच नियम पाळत नाहीत. तर नागरिकांचा प्रश्‍न तर दूरच आहे. त्यामुळे हा ‘डे’का साजरा केला जात आहे,त्यासाठी अट्टहास तरी का?असा प्रश्‍न नागरिकांनाही पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT