Ongoing cleaning of drains in Kisanraonagar. In the second picture, the cleaning of the Vivekananda Nagar drain esakal
जळगाव

Jalgaon News: महापालिकेतर्फे पावसाळपूर्व नाले सफाईला प्रारंभ! 5 मोठ्यांसह 123 लहान नाल्यांची स्वच्छता; नागरिकांमध्ये समाधान

Jalgaon News : जळगाव शहरात १२३ लहान, तर पाच मोठे नाले आहेत. पावसाळापूर्व नाल्यांची सफाई होणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. शहरातील पाच मोठ्या नाल्यांची पोकलॅन व जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहेत. नाला स्वच्छ केल्यानंतर गाळ नाल्याच्या काठावर न टाकता तो शहराबाहेर टाकण्यात येणार आहे. (Jalgaon municipal corporation started cleaning drains before monsoon)

जळगाव शहरात १२३ लहान, तर पाच मोठे नाले आहेत. पावसाळापूर्व नाल्यांची सफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. नाले सफाई झाली नाही, तर नाले तुंबून पाणी नाल्याकाठी असलेल्या नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होते. या पूर्वीही नाल्यांची सफाई न झाल्याने पावसाळ्यात नाले तुंबून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नाले सफाईसाठी महापालिकेतर्फे मक्ता काढण्यात येतो. यंदा लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे नाले सफाईचा मक्ता काढण्यास अडचण झाली होती. मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकारात्मकता दाखवून तातडीने मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेचा पावसाळापूर्व नाले सफाईचा मार्ग मोकळा झाला.

लहान नाल्यांची सफाई अंतिम टप्प्यात

महापालिकेतर्फे शहरातील १२३ लहान नाल्यांची सफाई अगोदरच सुरू झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची नियुक्ती करून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. लहान नाल्यांची सफाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. (latest marathi news)

मोठ्या नाल्याला प्रारंभ

शहरातील पाच मोठ्या नाल्यांची सफाई महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सोमवार (ता. २०)पासून सफाई सुरू करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. शहरातील मुख्य मोठा लेंडी नाला आहे. मेहरूणपासून, तर ममुराबाद रस्त्यापर्यंत हा नाला आहे. हरिविठ्ठलनगरातही मोठा नाला आहे. औद्यौगीक वसाहत व महामार्गावरील खोटेनगरातील नाल्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी जेसीबी व पोकलेन लावले आहेत.

गाळ शहराबाहेर टाकणार

शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई केल्यानंतर त्यांचा गाळ काठावर न लावता तो ट्रॅक्टरमध्ये भरून शहराबाहेर टाकण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गाळ नाल्याच्या काठावरच लावला, तर पावसाळ्यात पुन्हा तो नाल्यात जाऊन पाण्याचा प्रवाह बंद होण्याची भिती आहे. त्यामुळे गाळ शहराबाहेर टाकण्यात येणार आहे.

"शहरातील मोठ्या पाच नाल्यांची सफाई सोमवारी सुरू करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात येईल."

- चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT