Jalgaon Municipal Corporation Commissioner Vidya Gaikwad esakal
जळगाव

Jalgaon Municipal Corporation News : डॉ. विद्या गायकवाड यांची याचिका मागे! प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा

Jalgaon News : महापालिकेच्या रिक्त असलेल्या प्रशासक तथा आयुक्तपदाच्या नियुक्तीचा राज्य शासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipal Corporation News : महापालिकेच्या माजी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांच्या बदलीविरोधात मॅट न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी (ता. १०) अचानकपणे मागे घेतली. त्यामुळे महापालिकेच्या रिक्त असलेल्या प्रशासक तथा आयुक्तपदाच्या नियुक्तीचा राज्य शासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Jalgaon Municipal Corporation Vidya Gaikwad plea withdrawn)

माजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदली प्रकरणात सोमवारी (ता. ६) मॅट कोर्टात निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर होऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने १० मेस प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

शुक्रवारी मॅट न्यायालयात याचिकेवर सुनावणीस माजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड अनुपस्थित राहिल्या. मात्र, त्यांच्या वकिलाने ही याचिका मागे घेत असल्याचा अर्ज सादर केला. त्यानुसार मॅट न्यायालयाने हा अर्ज मंजूर करून घेत याचिका निकाली काढली. (Latest Marathi News)

डॉ. गायकवाड यांनी याचिका मागे घेतल्याने जळगाव शहर महापालिकेच्या रिक्त असलेल्या प्रशासक तथा आयुक्तपदावर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्य शासन आता या पदावर कोणाची नियुक्त करेल, याची उत्सुकता लागली आहे. तूर्तास अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडेच हा पदभार राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT