Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon : महापालिकेचे पगार अडकले ‘सॉफ्टवेअर’च्या मक्त्यात

कैलास शिंदे

जळगाव : महापालिकेच्या (Municipal Corporation Jalgaon) सॉफ्टवेअरचा मक्ता संपला. नवीन मक्ता देण्याची निविदा (Tender) काढण्यात आली आणि या प्रक्रियेतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन (Salary) अडकले आहे. मे महिनाअखेरपर्यंतही एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. (Jalgaon Municipal Corporation workers salary is stuck due to software Tender Jalgaon News)

प्रारंभी महापालिकेवर कर्ज असल्याने त्याच्या फेडीच्या हप्त्यात रक्कम खर्च होत असल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होत होते. मात्र, आता महापालिका कर्जातून मुक्त झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही निधी उपलब्ध होत आहे. त्याची कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एप्रिल महिन्याचे वेतन मे महिन्याअखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात न जमा झाल्यामुळे कर्मचारी चिंतित आहेत. अचानक वेतन का रखडले, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. याबाबत महापालिकेच्या अर्थ शाखेत माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले, की महापालिकेच्या सॉफ्टवेअरचा मक्ता संपला.

त्यामुळे त्या मक्तेदाराने आपले काम एप्रिलअखेर बंद केले. नव्याने मक्ता देण्यासाठी निनिदा काढल्यानंतर नवीन मक्तेदार नियुक्त करण्यात आला. त्या मक्तेदाराने सॉफ्टवेअर टाकले. मात्र, प्रारंभिक स्थितीत त्याच्याच कर्मचाऱ्यांनी ते काम सुरू केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास विलंब झाला आहे. आता ही वेतन बिले तयार करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT