Abhijit Raut latest marathi news esakal
जळगाव

जळगाव महापालिकेच्या कामांना स्थगिती नाही : जिल्हाधिकारी राऊत

महापालिकेच्या कोणत्याही विकास कामांना नियोजन शाखेकडून स्थगिती देण्यात आलेली नाही

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या कोणत्याही विकास कामांना नियोजन शाखेकडून स्थगिती देण्यात आलेली नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे. नियोजन विभागाकडील शासन परिपत्रक(४ एप्रिल २०२२)नुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सन २०२२-२३ अंतर्गत १ एप्रिल २०२२ पासून आजतागायत विविध योजनांतर्गत कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीने १ एप्रिलनंतर ज्या-ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या आहेत. त्या कामांच्या बाबतीत ४ जुलै २०२२ ला जी स्थिती असेल त्या स्थितीत ठेवावे, असे आदेश जिल्हा नियोजन समितीच्या कार्यान्वित यंत्रणांना कळविण्यात आलेले आहे.

१ एप्रिलनंतर जळगाव शहर महापालिकेकडील कोणत्याही कामास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेकडून महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना व नागरी दलितोत्तर वस्त्यांमधील सुधारणा योजना या योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाहीत व विकास कामेही रोखण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT