Jalgaon Municipal Corporation  esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : अमृत 2.0 चा विकास आराखडा दुरुस्तीनंतर पुन्हा मंजुरीसाठी

Jalgaon News : अमृत २.० अंतर्गंत शहरातील पाणीपुरवठ्याचा विकास आराखडा तयार झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमृत २.० अंतर्गंत शहरातील पाणीपुरवठ्याचा विकास आराखडा तयार झाला आहे. शासनाने काही त्रुटी सूचविल्यानुसार दुरुस्ती करून हा आराखडा आता तयार करण्यात आला आहे. तांत्रिक मंजुरीसाठी नाशिक जीवन प्राधीकरण विभागाकडे पाठविला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तो शासनाकडे मंजुरीस पाठविण्यात येणार आहे.

महापालिकेने अमृत २.० अंतर्गत पाणीपुरवठ्याचा डीपीआर तयार केला आहे. एकूण ३५२ कोटी रुपयांचा डीपीआर असून, यात सहा पाण्याच्या टाक्यांचे नवीन काम, ८० हजार नळांना वॉटर मीटर, १० किलोमीटरची नवीन पाइपलाइन, नवीन पंपींग मशिनरी, उमाळापासून ते एमआयडीसीपर्यंतची १५०० मिलिमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणे.

जलशुद्धीकरण केंद्राची मशिनरी आदी कामांचा समावेश आहे. पाणीपुरवठा योजनेचा विकास आराखडा पुढील २५ वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन तयार केला आहे. जीवन प्राधिकरणाचा नाशिक विभाग व शासनाकडून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेकडून त्यांची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. (latest marathi news)

मलनिस्सारण २.० आराखडा तयार

अमृत २.० अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी शहरातील तीन ठिकाणी जागाही निश्चित केल्या आहेत. मलनिस्सारण योजनेंतर्गंत शहरात सहाशे किलोमीटरची भूमिगत गटारीसाठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. ७५० कोटी रुपयांचा मलनिस्सारण योजनेचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून, लेआऊट निश्चित झाला आहे. या डीपीआरमध्ये ट्रीटमेंट प्लान्टही आहे. मललिस्सारण योजनेतून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एका प्रकल्पासाठी करार करून देण्यात येणार आहे.

"अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचा आराखडा दुरुस्तीनंतर पुन्हा जीवन प्राधीकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, तर मलनिस्सारण २.० योजनेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, तोही लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येईल."-योगेश बोरोले, प्रकल्पाधिकारी, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT