Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेची विकासकामे रखडली; निवडणूक संपली, परंतु निकालापर्यंत आचारसंहितेमुळे खोडा

Jalgaon Municipality : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) मतदान झाले. ४ जूनला निकाल लागणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) मतदान झाले. ४ जूनला निकाल लागणार आहेत. तब्बल २४ ते २५ दिवस अजून आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अनेक विकासकामांना आदेशाची प्रतिक्षाच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत असलेल्या आचारसंहितेबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी होत आहे. शहरातील बहिणाबाई उद्यान व सागर पार्क मैदानावर महापालिकेकडून चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. ( Municipal development work stopped )

मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार्जिंग स्टेशन उभारणीची कामे रखडली आहेत. निवडणूक झाल्यानंतर दोन दिवसांत निकाल लागल्यानंतर आचारसंहिताही संपत होती. मात्र, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर निकाल तब्बल २५ ते २६ दिवसांनी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेंतर्गत शहरातील विकासकामांचे आदेशही रखडणार असल्याचे सांगण्यात आले.

या आचारसंहितेचा फटका नागरिकांना बसत आहे. जळगाव महापालिकेची अनेक विकासकामे सुरू होती, त्यासाठी नियोजनही करण्यात आले होते. मात्र, आचारसंहितेमुळे ही कामे रखडणार आहेत. विशेष म्हणजे निकाल लागलेपर्यंत पुढील २५ दिवस महापालिका अधिकाऱ्यांना कामांच्या आदेशाचे कोणतेही काम करता येणार नाही.

शुद्ध हवा प्रकल्पाचे काम रखडले

जळगाव शहर महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे शुद्ध हवा उपक्रमांतर्गत शहरातील दोन ठिकाणी वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. त्यासाठी निविदा काढून ६० लाखांच्या मशिनरी खरेदी करण्यात आल्या आहेत. चार्जिंग स्टेशनसाठी शेड उभारणीच्या निनिदाही काढल्या होत्या. मात्र, निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया थांबविली आहे. आचारसंहिता आटोपल्यावर निविदा काढण्यात येणार आहेत.(latest marathi news)

चार्जिंग स्टेशनसाठी बहिणाबाई उद्यान व सागर पार्क मैदानावर प्रत्येकी दहा लाखांचे शेड उभारले जाणार आहे. पर्यावरण विभागातर्फे शहरातील प्रदूषणाचा स्थर कमी करण्याच्या उद्देशाने शुद्ध हवा उपक्रमांतर्गत शहरात येणाऱ्या ई-व्हेईकल (चार्जिंगची वाहने) धारकांना कमी दरात वाहने चार्ज करून मिळणार आहेत. चार्जिंग स्टेशन झाल्यावर शहरात चार्जिंग वाहनांच्या संख्येत वाढ होईल, या उद्देशाने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

इतर कामे रखडली

चार्जिंग स्टेशनशिवाय महापालिकेच्या इतर विकासकामांच्या निविदा रखडल्याचे सांगण्यात येत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या कामाच्या निविदा, शिवाजीनगरातील भुयारी गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विद्युत योजना बसविली आहे. आता केवळ काही प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प सुरू होणार आहे. मात्र, तोही आचारसंहितेत अडकला आहे.

याशिवाय शहरातील काही रस्त्यांच्या कामांच्या निविदाही अडकल्याने त्याची कामे झालेली नाहीत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपर्यंत आहे. त्यानंतर पुन्हा पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. त्याची आचासंहिता जाहीर होईल. त्यामुळे या कामांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. निवडणुका झाल्यानतंर निकाल लांबणीवर असल्यास आचारसंहितेचा कालावधी कमी करावा. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT