NCP (Sharadchandra Pawar) outlining the visit of state president Jayant Patil to the party office Arunbhai Gujarathi, Gulabrao Deokar, Valmik Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रविवारी मेळावा! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी साडेदहाला शिरसोली रोडवरील श्रीकृष्ण लॉन्समध्ये मेळावा होईल. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झाली. (NCP meeting on Sunday Presence of State President Jayant Patil)

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे निरीक्षक प्रसन्न पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील, अरुण पाटील, राजीव देशमुख, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील.

डी. के. पाटील, डॉ. मनोहर पाटील, अशोक लाडवंजारी, वाय. एस. महाजन उपस्थित होते. रविवारी जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर विधानसभानिहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका होतील. (latest marathi news)

जिल्हाध्यक्षपद अनिर्णयीतच...

लोकसभेत जळगाव जिल्ह्यात झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकारिण्या बरखास्त केल्या होता. नवीन जिल्हाध्यक्षासाठी अनेक इच्छुक आहेत. त्याचा अहवालही पक्षाच्या वरिष्ठांकडे गेला आहे. तरीही जिल्हाध्यक्ष निवडला गेलेला नाही. या बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडला जातो का, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT