The baby's body was removed from the Jalgaon graveyard esakal
जळगाव

Jalgaon News: जळगावच्या कब्रस्थानातून बाळाचा मृतदेह लांबवला; मोकाटकुत्र्यांनी नवजाताचा मृतदेह उकरल्याचा संशय

शहरातील अजिंठा चौकातील मोठ्या कब्रस्तानात एक दिवसापूर्वी पुरलेल्या नवजाताचा मृतदेह लांबवल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील मोठ्या कब्रस्तानात एक दिवसापूर्वी पुरलेल्या नवजाताचा मृतदेह लांबवल्याची घटना घडली.

मोकाट कुत्र्यांनी तीन फूट कबर उकरून हा मृतदेह लांबवल्याचा संशय असून मयत मुलाच्या पित्याने पोलिसांत धाव घेतल्यावर एमआयडीसी पोलिसांनी कुणाला आरोपी करावे, या कारणास्तव तक्रार घेतली नसल्याचे पित्याचे म्हणणे असून लेखी अर्ज घेवुन आम्ही तपास करू असे पोलिसांनी सांगितल्याचे मयत नवजाताच्या पित्याने सांगितले. (Jalgaon News Babys body exhumed from Jalgaon graveyard )

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील मुस्लीम कब्रस्तानात शेख करीम यांच्या कुटुंबीयांनी नवजात बाळाचा मृतदेह शनिवार (ता.३०) रोजी पुरला हेाता. धर्म प्रथेप्रमाणे आज सकाळी करीम शेख यांच्या कुटुंबासह कब्रस्तानात धार्मिक विधीसाठी गेले असता त्यांना अवघ्या अठरा तासांपूर्वी अंत्यविधी केलेली कबर उकरलेली दिसल्यावर ते आक्रोश करू लागले.

चौकशी केल्यावर त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत मृतदेहाचा शोध घ्यावा. तसेच दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी तक्रार देण्यास विनंती केली. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तक्रारी अर्ज घेतल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर पुनश्च कबर उकरण्यात आली. मात्र, त्यात कुठेही कफन, रक्ताचे डाग असे काहीच आढळून आले नाही. परिणामी कुटुंबीयांचा अधिकच संशय बळावला.

"आज सकाळी दहा वाजता मी कबरीवर वाहण्यासाठी फुलं आणि पाणी घेवुन प्रार्थनेसाठी पोचलो. आदल्या दिवशी दफन केलेल्या माझ्या बाळाची कबर उकरून त्यातील मृतदेह कुणीतरी लांबवला असल्याचे निदर्शनास आले. माझ्या कुटुंबीयांनी तत्काळ कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, त्यांचाही काही प्रतिसाद आला नाही. कब्रस्तानातील सेवेकरी शब्बीर शहा आणि अनिस शहा यांनी कुत्र्यांनी मृतदेह लांबवल्याची शक्यता असल्याचे आम्हाला सांगितले. माझ्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेवुन संबंधितांवर कारवाई करावी."

- करीम शेख ताज मोहम्मद (मृत बाळाचे वडील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT