coronavirus update 
जळगाव

जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे (Jalgaon coronavirus update) प्रमाण कमी होत असताना बरे होणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढत आहे. परिणामी (Jalgaon corona recovery rate) जिल्ह्याचा रिकव्हरी रेट तब्बल ९५ टक्क्यांवर पोचला आहे. गुरुवारी जिल्ह्यात नवे १५० रुग्ण आढळून आले तर त्यापेक्षा चौपट म्हणजे तब्बल ५८९ रुग्ण बरे झाले. (jalgaon-coronavirus-update-news-jalgaon-recovery-rate-up-this-week)

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी होऊ लागला आहे. मे महिन्यात तो टप्प्याटप्प्याने नियंत्रणात आला. आता जून महिन्यातही नवे बाधित कमी व बरे होणारे अधिक असा ट्रेंड कायम आहे.

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात १५० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार ४४६ झाली. तर ५८९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३३ हजार ५९८ झाला आहे. गेल्या २४ तासांत रावेर तालुक्यातील २८ वर्षीय तरुणासह ५ रुग्णांचा बळी गेला, एकूण बळींचा आकडा २५४४ वर पोचला आहे.

पॉझिटिव्हीटी २ टक्क्यांच्या आत

रॅपिड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर अशा एकूण ८ हजार ८१६ चाचण्यांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. पैकी १५० नवे बाधित समोर आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी (चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण) १.७४ टक्के एवढी अल्प नोंदली गेली.

११ तालुके दहाच्या आत

जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यांमध्ये नवीन रुग्णसंख्या दहाच्या आत नोंदली गेली.

असे आढळले रुग्ण : जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ७, अमळनेर ६, चोपडा १, भडगाव ६, पाचोरा ८, यावल १, एरंडोल ३०, जामनेर २१, रावेर २, पारोळा ५, चाळीसगाव २५, मुक्ताईनगर २, बोदवड २.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT