farmer Waiting for justice esakal
जळगाव

Jalgaon News : त्या शेतकरी दांपत्याला न्यायाची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला गेल्या चार दिवसांपासून प्रारंभ केला आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीसह मालमत्ता समसमान वाट्याचा हक्कदार असतानाही त्याला हक्कापासून वंचित ठेवल्याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी शेतकरी अण्णा सुकदेव महाजन पत्नीसह उपोषणाला बसले असून चार दिवस उलटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

पहाण (ता.पाचोरा) येथील शेतकरी अण्णा महाजन सहा भावंडे असून, त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात वाद सुरू आहे. भावंडांनी हिस्याची मिळकत आपल्याला मिळू दिली नाही, असा त्यांचा आरोप असून, अन्याय करणारी भावंडे उच्चपदस्थ अधिकारी असून जाणीवपूर्वक ते आपल्याला न्यायापासुन वंचित ठेवण्यासाठी यंत्रणेवर सारखा दबाव आणत आहे.

न्याय मिळवा यासाठी त्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. मात्र, जिल्‍हाधिकारी अमन मित्तल मंगळवार (ता.१९) पर्यंत सुटीवर असल्याने प्रशासनाकडून अद्याप या दांपत्याच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. संबंधित भावंडापैकी मोठे भाऊ जिल्ह्यात उच्चपदस्थ अधिकारी असल्याने आपल्याला न्यायापासुन वंचित ठेवण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करण्यात येत असून यंत्रणेवर दबाव आणला जात आहे.

वडिलोपार्जित मिळकतीचा हिस्सा मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते लढा देत असून आजवर अनेक तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. संबंधितांकडून तक्रारी निकाली काढण्यात येत असल्याने न्यायालयात दावा दाखल केला आहे., असे महाजन यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT