Anandacha Shida esakal
जळगाव

Shiv Jayanti 2024 : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

Jalgaon : श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधा वाटप सुरु झाले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० संच आले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप सुरू केले आहे. शिधा मिळू लागल्याने यंदा गोरगरीब लाभार्थ्यांत समाधान आहे. (On occasion of Shiv Jayanti distribution of Anandacha Shida to poor at all ration shops in jalgaon district)

मैदा, पोहाही संचात

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे.

प्रति शिधापत्रिका एक असे या संचाचे वाटप केले जात आहे. शिधापत्रिकाधारकांनी आनंदाचा शिधा संच घेऊन जावे असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे

तालुका व आलेले संच असे

पारोळा ३० हजार १०५

पाचोरा ४५ हजार

चोपडा ४४ हजार ४४३

बोदवड १५ हजार १९५

धरणगाव २९ हजार ७१०

अमळनेर ४६ हजार ३०७

भडगाव २६ हजार ८८५

चाळीसगाव ६१ हजार ८३

जळगाव ८३ हजार ९८८

जामनेर ४७ हजार ५८२

मुक्ताईनगर १७ हजार ६६५

कुऱ्हा ९ हजार ४३५

यावल ३७ हजार २६५

एरंडोल २५ हजार ३६३

भुसावळ ३८ हजार ५००

रावेर ३५ हजार ४५२

सावदा १८ हजार ७८२

एकूण ६ लाख १२ हजार ७६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT