Jalgaon Dam Construction esakal
जळगाव

Jalgaon News : पाडळसे प्रकल्पाचे काम वाळूमुळे रखडले

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : पाडळसे प्रकल्पाचे काम वाळू उपलब्ध नसल्याने रखडले आहे. नाशिक कार्यालयाने निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेर कार्यालयाला याबाबतचे पुढील नवे डिझाईन व कामासंदर्भातील योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

यानुसार सुरवातीला कटिंगचे काम करण्यात आले. मात्र, वाळूची उपलब्धता नसल्याने काम खोळंबले आहे. राज्य सरकारचे नवे वाळू धोरण निश्‍चित झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामासाठी वाळू उपलब्ध होईल व काम सुरू होईल.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ई. शं. पढार यांनी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला. आयआयटी मुंबईचे डॉ. आर. एस. जांगीड यांनी सादर केलेल्या वस्तुनिष्ठ अहवालातील निष्कर्षानुसार प्रस्तंभातील सविस्तर संकल्पन नाशिकच्या ‘मेरी’कडून मिळण्यास व याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी शासनास विनंती केली होती.

यानंतर जलसंपदामंत्र्यांनी पाडळसे प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पांतर्गत संकल्पनात्मक बाबी संदर्भात एका महिन्याच्या आत निर्णय घेऊन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात प्रकल्पस्थळी आदेश दिले होते. त्यानुसार पुढील सत्वर कार्यवाहीसाठी विनंती पढार यांनी केली होती.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

डॉ. जांगीड यांनी सादर केलेल्या वस्तुनिष्ठ अहवालातील निष्कर्षांचा (प्रस्तंभाचे पायापासून ते माथा लेवल (१३९.२४ मी) पर्यंत लोहसळींची अतिरिक्त तिसरी रांग देण्याची आवश्यकता नाही. प्रस्तंभाच्या उर्वरित भागासाठी पुरेशी गाभ्याची लांबी देऊन संकल्पनातील आवश्यकतेनुसार लोह देण्यात यावे व त्यानुसार पुढील बांधकाम करण्यात यावे, असे नमूद केले आहे.

तसेच त्यावर मुख्य अभियंता (मेरी) यांनी अभ्यास केला आहे. प्रस्तंभाच्या उर्वरित भागासाठी पुरेशी गाभ्याची लांबी देऊन संकल्पनातील आवश्यकतेनुसार लोह देण्यात यावे व त्यानुसार पुढील बांधकाम करण्यात यावे, असे निष्कर्षात नमूद असल्याने तसे नवे डिझाईन तयार केले व त्यास मंजुरीही मिळवली.

हे नवे डिझाईन आणि पुढील कामासंदर्भात योग्य त्या सूचनाही तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला (जळगाव) देण्यात आल्या. जळगाव कार्यालयाने निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेर कार्यालयाला याबाबतचे डिझाईन व पुढील कामासंदर्भातील योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

यानुसार सुरवातीला फिटिंगचे काम करण्यात आले. मात्र, वाळूची उपलब्धी नसल्याने काम खोळंबले आहे. राज्य सरकारचे नवे वाळू धोरण निश्‍चित झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामासाठी वाळू उपलब्ध होईल व काम सुरू होईल.

''नाशिक कार्यालयाकडून पुढील नवे डिझाईन व बांधकामाबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, सेंट्रिंग आदी सर्व साहित्य व यंत्रणा आपल्याकडे आहे. मात्र, वाळूची उपलब्धता नसल्याने काम थांबले आहे. वाळू उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती दिली जाईल.'' - मुकुंद चौधरी, कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प विभाग, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, दोन जखमी, चालकाचा डोळा लागला अन् तेवढ्यात कार...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी! विशालची बाथरुममधून 'ती' वस्तू हरवली, थेट कॅप्टनचं जेवण होणार बंद?

'कोर्टाने आदेश दिला म्हणून शरण आलो', जामीनावर बाहेर येताच मंत्रिपुत्राची पुन्हा 'दादागिरी'

Latest Marathi News Live Update : मालाड पश्चिमेकडील मालवणीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग

विदेशात करिअर करायचंय? वर्ल्ड बँक Pioneers Internship 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; आजच या संकेतस्थळावर क्लिक करा!

SCROLL FOR NEXT