Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : राजकीय पक्षांचा निवडणुकीविषयी बैठकांना ‘खो’

Jalgaon Lok Sabha Election : लवकरच देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर होतील. त्याची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : लवकरच देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर होतील. त्याची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दर महिन्याला किमान दोन तीन बैठका राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी, सदस्यांसोबत होणे आवश्‍यक असते. मात्र जिल्हा प्रशासन दरवेळी जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक विषयी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावते. (Jalgaon political parties not coming to election meeting)

मात्र ते पदाधिकारी येत नसल्याचे चित्र आहे. काही पदाधिकारी तर तुम्हीच बैठका घेऊन टाका आम्ही हजर असल्याची नंतर येऊन सही करू, असे सांगताना दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाने अंतिम यादी मतदार प्रसिद्ध केली. २३ जानेवारीस त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर प्रतिनिधी नव्हते. नंतर राजकीय पक्षाचा बूथ लेव्हल सहाय्यकाची नेमणुकीबाबतही बैठक झाली. त्या बैठकीकडेही भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी , शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती.

आज १५०० मतदार संख्येपेक्षा अधिक मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर आक्सीलरी (अतिरिक्त) मतदान केंद्र कोणत्या ठिकाण द्यावे, ज्येष्ठ मतदार जे बेडवर आहेत त्यांना मतदान करण्यासाठी कशी मदत करता येईल.

याबाबत विचार करून त्यांच्या मतदानाबाबत निर्णय घ्यावयाचा होता. मात्र याही बैठकीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.

राजकीय पक्षाचे पदाधिकारीच निवडणूक विषयक बैठकींना हजर नसतील तर जिल्हा प्रशासनाने बैठका तरी का घ्याव्यात आणि बैठका घेऊन राजकीय पक्षांना अपेक्षीत नसलेला निर्णय घेतला तर तो निर्णय राजकीय पक्षांना मान्य असेल का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT