Fraud
Fraud esakal
जळगाव

Jalgaon News : बनावट सौदा पावतीआधारे मिळकती हडपण्याचा डाव; 2 वकिलांसह 11 संशयितांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खोट्या दस्तऐवजांच्या अधारे बनावट सौदा पावती करून कोट्यावधीची मालमत्ता हडपण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख, ॲड. सुरेखा पाटील, ॲड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मौजे पिंप्राळा शिवारातील जागा, मजल्यावरील बांधीव घर, तळमजल्यावरील सामाईक अविभाज्य व गच्ची मालकी हक्कासह मिळकत नोंदणीकृत खरेदी खतान्वये प्रत्येकी ३० लाख, प्रत्येकी किंमत राजेश पाटील यांना अदा करून त्यांच्याकडून ३ ऑक्टोबर २०१९ ला खरेदी केली होती. खरेदी खतानुसार मिळकत वाणी दांपत्याच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे (कै.) घनश्‍याम लक्ष्मण पाटील यांच्याकडून भाडेतत्वाचा करारनामानुसार १८ मार्च २०१६ ला मेहरूण शिवारातील प्लॉट क्रमांक १८/२ रामदास कॉलनीत ऑफीससाठी जागा व्यावसायिक वापर करण्यासाठी १० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये अशी भाड्याने घेतली आहे.

वर्तमानपत्रात नोटीस
२ नोव्हेंबर २०२२ ला दोन वर्तमानपत्रामधील जाहीर नोटिशीद्वारे वाणींना समजले, की त्यांचे मालकीचे राहते घर आणि रामदास कॉलनीतील प्लॉट भाडेतत्वावर घेतलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील मिळकती बनावट सौदेपावत्या राजेश घनश्‍याम पाटील यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र बाबूराव देशमुख (रा. अयोध्यानगर,), मिलिंद नारायण सोनवणे (नूतनवर्षा कॉलनी), जगदीशचंद्र पुंडलीक पाटील (खोटेनगर स्टॉपजवळ), सुजाता राजेश पाटील (शिवरामनगर), विनिता संजय पाटील (उदयपुरा बंगळुरु), लिना रणजित बंड (अमरावती), अनिता नितीन चिंचोले (आदर्शनगर, जळगाव), ॲड. सतीश बी. चव्हाण (रामबाग कॉलनी), ॲड. सुरेखा डी. पाटील (रा. जळगाव) यांनी आपआपसांत संगनमत करून (कै.) घनश्‍याम लक्ष्मण पाटील व हिराबाई लक्ष्मण पाटील यांच्यासोबत २ जानेवारी २०१७ ला लेखी सौदा पावती करारनामा झाला.

त्यानुसार ४५ लाख रुपये वेळोवेळी अदा केले आहेत, असे सौदा पावतीत नमूद असताना, सर्व संशयितांनी कटकारस्थान करत नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेली मिळकत हडप करता यावी, यासाठी मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेत त्यावर मृत (कै.) घनश्‍याम पाटील यांच्या खोट्या सह्या करून खोटी रक्कम दिल्याचे नमूद करत दोन्ही सौदा पावत्या खोट्या व बनावट करत माझी फसवणूक केली असल्याचेही मनोज वाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT