Bahinabai Choudhary Students participating in Shiv Jayanti procession Uttar Maharashtra University. esakal
जळगाव

Shiv Jayanti 2024 : पोवाडा, नृत्य, नाट्यातून उमवित शिवरायांना वंदन

Shiv Jayanti : पोवाडा, नृत्य, पाळणागीत, नाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाव्दारे केलेले शिवरायांचे स्मरण यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिवजयंती यावेळी अनोखी ठरली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तरुणाईच्या जल्लेाषात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची काढण्यात आलेली मिरवणूक आणि त्यानंतर पोवाडा, नृत्य, पाळणागीत, नाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाव्दारे केलेले शिवरायांचे स्मरण यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिवजयंती यावेळी अनोखी ठरली. (Shivaji Maharaj)

शिवजयंती निमित्त विद्यापीठात सकाळी ९ वाजता मुख्‍य प्रवेशव्दारापासून शिव प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मावळ्यांचा वेष, फेटे परिधान करुन विद्यार्थी तर काही नऊवारी साडया घालून विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पृथ्वीक पाटील तर जिजाऊंच्या वेशभुषेत श्रध्दा अहिरराव हे विद्यार्थी होते. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आली. त्यानंतर सिनेट सभागृहात दोन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केला.

पोवड्यांनी रोमांच

यामध्ये महेश शेंडगे याने शिवजन्माचा आणि अफजलखानाचा वधाचा पोवाडा, राखी शेंडे हिने पाळणागीत, अतुल सुर्यवंशी याने रायगडावरील कथा, माधुरी महाजन, सारिका खारबे, विजय पाटील व महेश जाधव यांनी गीते सादर केली.

त्यांना तबल्यावर प्रा.तेजस मराठे व हार्मोनियमवर मनोज गुरव यांनी साथ संगत दिली. विद्यार्थी मनोज पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी अफजलखानाचा वध तर व सामाजिकशास्त्र प्रशाळेतील टीना सपकाळे व तिच्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीतील लढाई ही नाटके सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस

तसेच ३५० व्या शिवराज्याभिषेका निमित्त आयोजित भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेते विद्यार्थी वैभव फुंडकर (प्रथम), ज्ञानेश्वर सपकाळे (व्दितीय) तर शीतल सोनवणे व शरद सोनवणे (तृतीय) यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील.

विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे, छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख प्रा.अजय पाटील, पी.ई.तात्या पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे, विद्यार्थी चिराग चव्हाण, हर्षदा पाटील व रुपाली पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

Beed: कार्डियक रुग्णवाहिका पोहचली थेट पोलीस ठाण्यात; डॉक्टरची मोठी चूक? अपघातातल्या रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT