Bhadgaon Officials of all parties attended meeting organized regarding RTO office. esakal
जळगाव

Jalgaon News : आरटीओ कार्यालयाच्या प्रश्नावर शुक्रवारी ‘रास्ता रोको’

Jalgaon News : आरटीओ कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे व्हावे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील प्रस्तावित आरटीओ कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे व्हावे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधीनी 'मी भडगावकर' म्हणून आपली भूमिका मांडत आरटीओ कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालयासाठी एकजुटीने लढा देण्याचे ठरविण्यात आले.

‘मी भडगावकर....आम्ही भडगावकर’ हा एकच नारा देत शुक्रवारी (ता. २३) रास्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. (Stop road movement on question of RTO office)

भडगाव येथे प्रस्तावित आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे पळविण्यात आले. तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाबत देखिल हीच गत आहे. यामुळे भडगावकर संतप्त झाले आहेत. पुढील लढा उभारण्यासाठी आयोजित बैठकीस सचिन चोरडिया, अनिल वाघ, लखीचंद पाटील, सोमनाथ पाटील, सुयोग जैन, हर्षल पाटील,

सचिन पाटील, रवींद्र सोनवणे, इम्रान अली, योजना पाटील, शंकर मारवाडी, विजय भोसले, संजय सोनवणे, मनोहर चौधरी, डॉ. निळकंठ पाटील, विलास नेरकर, दिलीप शेंडे, रतिलाल महाजन, किरण शिंपी, आण्णा मोरे, नीलेश पाटील, प्रा. उत्तमराव पाटील, अमोल पाटील, ॲड. नीलेश तिवारी, नीलेश मालपुरे आदी शेकडोंच्या संख्येने भडगावकर उपस्थित होते.

बैठकीत सोमनाथ पाटील, शंकर मारवाडी, विजय भोसले, अनिल वाघ, इम्रान अली सय्यद, डॉ. निळकंठ पाटील, भय्यासाहेब पाटील, चौधरी, परदेशी, हाजी जाकीरशेठ, विजय सांळुखे, संजय पवार यांनी आंदोलन संदर्भात मते मांडली.

पक्षीय जोडे बाजूला काढून भडगावकर म्हणून एक व्हा. २०११ पासून आरटीओ कार्यालय आंदोलनास सुरवात झाली आहे. याबाबत शुक्रवारी (ता. २३) रास्तारोको करण्यात येणार असून, तो काळा दिवस पाळून आंदोलन करावे.

रास्ता रोकोसाठी ग्रामीण भागात जनजागृतीसाठी तालुक्यातील गावागावात दवंडी देण्यात यावी. आपण अन्याय सहन करत राहणार का? असाच अन्याय होत राहिला तर आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.

तसेच ज्यांना जे शक्य आहे. त्यांनी योगदान द्यावे, असे मते मांडून सर्वानुमते आंदोलनासंदर्भात आठ ठराव या बैठकीत पारीत करण्यात आले. आंदोलनाची दिशा या आठ ठरावानुसारच राहील, असे निश्चित करून बैठकीनंतर शुक्रवारच्या रास्ता रोको आंदोलनाबाबत तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT