death esakal
जळगाव

Jalgaon News : अतिक्रमणमध्ये घर जाणार या धसक्याने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : येथील पालिकेने शहरातील फायनल प्लॉट १२३ भागातील अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशाने हटवायला सुरवात केलेली असून, अतिक्रमणाच्या धसक्याने एका ५० वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरात रात्री घडली.

अमळनेर पालिकेने अनेक वर्षांपासून वादातीत असलेल्या जुन्या बसस्थानकाजवळील फायनल प्लॉट १२३ भागातील अतिक्रमण काढायला सुरवात केली. यात १५० पेक्षा जास्त दुकाने, तात्पुरती बांधलेली घरे, भाजीपाल्याचे ओटे यांचे बांधकाम आहे. अतिक्रमण बाधित कुटुंबांना पालिकेने म्हाडाच्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरित केले. मात्र याच भागातील ४० ते ५० पांचाळ कुटुंब गावाबाहेरील असलेल्या म्हाडाच्या इमारतीत जायला तयार नसल्याने त्यांनी अतिक्रमण काढायला आलेल्या पथकाला विरोध केला.

७० ते ८० वर्षांपासून याच ठिकाणी रहिवास असल्याने जागा खाली करण्यास पांचाळ कुटुंब विरोध करत होते. याच अतिक्रमण मोहिमेचा धसका घेत तसेच बेघर होण्याच्या भीतीने शोभाबाई रोहिदास पांचाळ (वय ५०) या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने शुक्रवारी (ता. १८) रात्री आठला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रात्री दहाच्या दरम्यान मृत घोषित केले.

महिला मृत झाल्याने पांचाळ कुटुंबीयांनी मृतदेह शनिवारी (ता. १९) दुपारी दोनला प्रांत कार्यालयात आणत पालिका प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करत अंत्यविधी करण्यास नकार दिला. प्रशासनाचे अधिकारी बाहेरगावी असल्याने मृतदेह चार तास जागेवर पडून राहिला. या वेळी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी प्रशासन, बाधित कुटुंबीय तसेच मुख्याधिकारी यांच्याशी बोलणे करून दिले. पाच डिसेंबरपर्यंत अतिक्रमण मोहीम स्थगित करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. रात्री उशिरा महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी (ता. २१) पालिका प्रशासन तसेच पांचाळ समाज यांच्यात बैठक होणार असून, यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.

''न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण मोहीम सुरू असून, बाधित कुटुंबीयांना म्हाडाच्या कॉलनीत घरे दिली आहेत. त्या ठिकाणी पालिकेने पाणी, वीज तसेच इतर सोयीसुविधा पुरविलेल्या आहेत. बाधित कुटुंबीयांनी प्रशासनाला वेठीस धरू नये.''

- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर

''अतिक्रमण काढताना बाधित कुटुंबीयांना पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली जात असून, पर्यायी कायमस्वरूपी व्यवस्था तसेच लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही अतिक्रमण काढू देणार नाहीत.'' - अंबर पांचाळ, रहिवाशी, फायनल प्लॉट १२३, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुम्ही फक्त लिहा! गुरुजींनीच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या चीट, ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरं 'सेम टू सेम'; २६ शिक्षक निलंबित

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची तब्येत बिघडली; लीलावती इस्पितळात दाखल; वडिलांच्या काळजीने भाईजानची इस्पितळात धाव

Eknath Shinde: पहलगाममध्ये मृत्युमुखी जगदाळेंच्या मुलीस सेवेत घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे महापालिकेस निर्देश!

Satara Crime: फलटणमधील दोघे तडीपार; सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई, विविध ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल!

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT