Nimbola collected by Krishi Bhushan Dilip Patil Labor while doing. esakal
जळगाव

Jalgaon News : निंबोळ्या काढण्याचा हंगाम सुरू; वडनेच्या शेतकऱ्याचाही समावेश

Jalgaon : खानदेशात दरवर्षी निंबोळ्यापासून हजारो लिटर तयार होणाऱ्या निंबोळी तेलाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर निंबोळी गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

ॲड. बाळकृष्ण पाटील

Jalgaon News : खानदेशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात निम वृक्षाची लाखो झाडे आहेत. दरवर्षी मृगनक्षत्रात पक्व झालेल्या पिवळसर लालसर निंबोळ्या या झाडावरून खाली पडतात. त्या गोळा करून त्यापासून निंबोळी पेंड व निंबोळी तेल (ऑइल) तयार करण्याचे काम केले जाते. खानदेशात दरवर्षी निंबोळ्यापासून हजारो लिटर तयार होणाऱ्या निंबोळी तेलाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर निंबोळी गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ( Nimbola harvesting season has started )

चोपडा, भुसावळ, जळगाव, शहादा, धुळे परिसरात बरेचजण निंबोळी किलोप्रमाणे गोळा करून त्या वाळवतात व त्यापासून निंबोळी पेंड, निंबोळी तेलाचे उत्पादन करतात. जैविक शेती व सेंद्रिय शेतीच्या प्रयोगात निंबोळी पेंड व निंबोळी तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्याचप्रमाणे कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग दरवर्षी प्रशासकीय पातळीवर सुरू असतात.

गेल्या काही वर्षाचा विचार करता निंबोळी तेलाचा वापर वाढत असल्याचे दिसून येते. शेतकरी कपाशीच्या फवारणीत व अन्य पिकांच्या फवारणीत निंबोळी तेलाचा वापर करीत असल्याचे दिसून आले. आरपीएमच्या निकषानुसार किंवा पाच टक्के, दहा टक्के मिळणारे निंबोळी तेल बाजारातही आता उपलब्ध झाले आहे. ७५ रुपयांपासून ते दीडशे रुपये लिटरप्रमाणे त्याची विक्री केली जाते. त्याचबरोबर बरेच शेतकरी पिकांसाठी निंबोळी पेंडांचा वापर करीत असल्याचे दिसते. (latest marathi news)

फवारणीत केला जातो वापर!

खानदेशात वडणे (ता. धुळे) येथील तालुका कृषी कार्यालयाच्या प्रशिक्षण केंद्रात अशा प्रकारचा प्रयोग दरवर्षी राबविला जातो. कृषीभूषण (सेंद्रिय) दिलीप पाटील हे दरवर्षी निंबोळी गोळा करून त्यापासून निंबोळी तेलप्रक्रिया करून त्याचा वापर शेतीत करीत असल्याचे अनेक वर्षाचे उदाहरण आहे. निंबोळी तेलात कीड मारण्याची, तिची कार्यक्षमता कमी करण्याची क्षमता असल्याने त्याचा वापर फवारणीत केला जातो.

सध्यास्थितीत खानदेशात सर्वत्र शेकडो टन निंबोळ्या झाडावरून खाली पडल्या असून, मजूर किलोप्रमाणे ती वेचून आणून देतात. त्या उन्हात सुकवून त्यावर प्रक्रिया करून तेल व पेंडचे उत्पादन घेण्यासाठी सध्या खानदेशात निंबोळ्या गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT