Dawood Ibrahim: दाऊदच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, स्थानिकांच्या विरोधानंतर पालिकेची कारवाई ऐनवेळी स्थगित

BMC Demolished Dawood Ibrahim House : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घरावर बुलडोझर चालवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र स्थानिकांनी विरोध केल्यानंतर पालिकेने ऐनवेळी कारवाई स्थगित केली.
BMC Action On Dawood Ibrahim House

BMC Action On Dawood Ibrahim House

ESakal

Updated on: 

मुंबई : गुंड दाऊद इब्राहिमच्या भेंडी बाजारातील वडिलोपार्जित घरावर मुंबई महापालिकेची तोडक कारवाई ऐनवेळी स्थगित झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना या इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या सी विभाग कार्यालयाने १६ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. त्यानुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...