Officials of Forest Department giving written assurance letter to youth leader Dhananjay Chaudhary to allow Forest Department to start road works within two days. esakal
जळगाव

Jalgaon News : अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर ‘एनएसयूआय’चे ‘रास्ता रोको’ मागे; रस्त्यांची 2 दिवसांत पाहणी

Jalgaon : एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुसुंबा आणि अभोडा येथे आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन तब्बल पाच तासानंतर मागे घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील वन परिसरात येणाऱ्या रस्त्यांची दोन दिवसांत पाहणी करून डांबरीकरण, खडीकरणासाठी तातडीने परवानगी देण्याचे आश्वासन वन विभागाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुसुंबा आणि अभोडा येथे आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन तब्बल पाच तासानंतर मागे घेण्यात आले. (NSUI protest back after written assurance from officials)

महसुली क्षेत्रातील रस्त्यांची कामेही त्वरित सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली. तालुक्यातील आदिवासी भागातील पाल - रावेर व्हाया कुसंबा व पाल- रावेर व्हाया आभोडा या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ ते दुपारी ४ असे ५ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. (latest marathi news)

हे दोन्ही रस्ते २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर महायुती सरकारने ही मंजूर कामे स्थगित केली. आमदार शिरीष चौधरींनी प्रयत्नपूर्वक स्थगिती उठविल्यानंतर बांधकाम विभागाने या कामांना कार्यारंभ आदेश दिला. राजकीय दबावामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थितांनी यावेळी केला.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, राजीव सवर्णे, महेंद्र पवार, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, लियाकत जमादार, संजय पवार, युनूस तडवी, सलिम तडवी, नारायण घोडके, प्रदीप सपकाळे, मुबारक तडवी, मुकेश पाटील, विवेक महाजन, भगवान महाजन व गावातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT