MP Raksha Khadse giving a statement to Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes. esakal
जळगाव

Jalgaon News : केंद्राच्या OBC यादीत गुर्जर, पोटजातींना घ्यावे; खासदार रक्षा खडसे यांची मागणी

Jalgaon : गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींचा राज्यात ओबीसी प्रवर्गात समावेश होतो. मात्र, केंद्र सरकार त्यांचा समावेश खुल्या प्रवर्गात करते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींचा राज्यात ओबीसी प्रवर्गात समावेश होतो. मात्र, केंद्र सरकार त्यांचा समावेश खुल्या प्रवर्गात करते; त्यामुळे अनेक वर्षांपासून गुजर समाजातील मुलांचे शिक्षण व नोकरीमध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करावा, याबाबत खासदार रक्षा खडसे पाठपुरावा करीत आहेत. (Jalgaon OBC list of Centre Gurjar sub caste should be taken Demand of MP Raksha Khadse)

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर भुसावळ येथे आले असता श्रीमती खडसे यांनी त्यांची भेट घेऊन गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींना केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करण्याबाबत मागणी केली.

निवेदनात गुर्जर व इतर गुर्जर पोट जातीत (उदा. लेवे गुर्जर, रेवे गुर्जर, रेवा गुर्जर, सूर्यवंशी गुर्जर आदी) यांचा समावेश आहे. शुक्रवारी (ता.१) मुंबई येथे श्री. अहीर हे राज्य शासनासह बैठक घेणार आहेत. (Latest Marathi News)

त्यात हा मुद्दा उपस्थित करणार असून, राज्याने सकारात्मक विचार करून प्रस्ताव सादर केल्यास, केंद्र सरकारतर्फे गुर्जर व इतर गुर्जर पोट जातींना ओबीसी यादीमध्ये लवकरच समावेश करून मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन हंसराज अहीर यांनी श्रीमती खडसे यांना दिले.

यामुळे गुर्जर व इतर गुर्जर यांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांच्या लाभासह शिक्षण व नोकरीत लाभ मिळविण्यासाठीचा मार्ग खुला होऊन निश्चित गुर्जर व इतर गुर्जर यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT