Transfer
Transfer esakal
जळगाव

Jalgaon Officers Transfer: धुळ्यात अविश्‍वास अन्‌ जळगावात सीईओपदी नियुक्ती! लोकप्रतिनिधींच्या नाराजीतून अंकित यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Officers Transfer : धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी विश्‍वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करीत, मागील आठवड्यातच अविश्‍वास ठराव मंजूर केला होता. (Jalgaon Officers Transfer) आठवडाभरातच त्यांची बदली करत जळगाव जिल्हा परिषदेला नियुक्ती देण्यात आली आहे. (Jalgaon Officers Transfer Disbelief in Dhule appointment CEO in Ankit marathi news)

जळगाव जिल्हा परिषदेत दहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री अंकित रुजू झाले होते. अवघ्या दहा महिन्याच्या कालावधीत त्यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. जळगाव जिल्हा परिषदेत आतापर्यंत आलेल्या सीईओंमध्ये सर्वात कमी कालावधी कार्यकाळ राहणारे सीईओ ठरले आहेत.

अर्थात त्यांनी आपल्या १० महिन्याच्या कालावधीत प्रशासक म्हणून जबाब्दारी सांभाळली. या कालावधीत अनेक कामांच्या फाईल लवकर मार्गी लागत नव्हत्या. मुख्य म्हणजे त्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखला नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये श्री अंकित यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. या नाराजीतूनच अंकित यांची बदली झाली आहे.

तिकडे अविश्वास इकडे नियुक्ती

जळगाव जिल्हा परिषदेवर नियुक्त करण्यात आलेले सीईओ शुभम गुप्ता यांची धुळे येथील कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मागील आठवड्यात १३ मार्चला धुळे जि.प.च्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य संजय पाटील यांनी सीईओ गुप्ता यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडला.

यात एकूण ५१ सदस्यांनी हात उंचावून अविश्‍वास ठराव मंजूर केला. यामध्ये सत्ताधारी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष सदस्यांनी एकजूट होत निर्णय घेतला होता. यानंतर आठवडाभरातच त्यांची बदली करत जळगाव जिल्हा परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. (latest marathi news)

विश्वासात घेत नाही...

धुळे जि. प. सदस्यांच्या आरोपांनुसार सीईओ गुप्ता यांनी शिक्षण विभागाशी संबंधित २३ केंद्रप्रमुख, आठ विस्ताराधिकाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबविली होती. ही प्रक्रिया राबविताना अध्यक्ष, शिक्षण सभापतींना विश्‍वासात घेतले नव्हते. इतकेच नाही तर सदरच्या प्रक्रियेत अनियमित कारभार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासारख्या अन्य तक्रारी असल्याने सर्व सदस्यांनी मिळून शुभम गुप्ता यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.

जळगावात समन्वयाचा प्रश्न

लोकप्रतिनिधींची नाराजी असल्याने सीईओ श्री अंकित यांची बदली करण्यात आली आहे. यात धुळे येथे अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर शुभम गुप्ता जळगावला येत आहेत. यामुळे आता ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी कसा समन्वय राखतील. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT